Headlines

yogguru ramdev baba meets cm eknath shinde after devendra fadnavis

[ad_1]

योगगुरू रामदेवबाबांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीचे फोटो खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. त्यांच्या भेटीवरून तर्क-वितर्क सुरू झालेले असतानाच आता रामदेवबाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. तसेच, रामदेवबाबांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारीदेखील म्हटल्यामुळे यावरून नव्याने राजकीय चर्चा सुर होण्याची शक्यता आहे.

शिवसेना विरुद्ध शिंदे गट वादात भर?

एकीकडे राज्यात आधीपासूनच खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचं निवडणूक चिव्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा? यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता योगगुरू रामदेवबाबा यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटल्यामुळे या वादात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले रामदेवबाबा?

योगगुरू रामदेवबाबांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं सांगितलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो”, असं रामदेवबाबा म्हणाले आहेत.

“बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. एकनाथ शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत असं आम्हाला वाटतं. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला. फार चांगलं वाटलं”, असंदेखील रामदेवबाबांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *