या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाची मुलं पत्नीला कायम ठेवतात खूश


मुंबई : आई आणि मुलानंतर सर्वात सुंदर नातं येतं ते पती-पत्नीचं ज्यामध्ये विश्वास आदर आणि भरभरून प्रेम असतं. प्रत्येक तरुण आपल्या आयुष्यात आपल्यावर खूप प्रेम करणारा जोडीदार असायला हवा हे स्वप्न पाहातो. पण अशी काही अक्षरं आहेत ज्यांचं आपल्या पत्नीवर जरा जास्तच प्रेम असतं. जाणून घ्या यामध्ये तुमचं अक्षर आहे की नाही ते.

ज्योतिष शास्त्रानुसार अशी काही अक्षरं आहेत त्यांना फार महत्त्व आहे. या अक्षराच्या नावाचे तरुण पार्टनरला फार प्रेम देतात. अगदी फुलासारखं जपण्याचा प्रयत्न करतात सगळी सुखं देतात. आयुष्यातील प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी दोघेही एकमेकांना साथ देतात. 

D या  अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावाची मुलं आपल्या पार्टनरची खूप जास्त काळजी घेतात. ते आपल्या पार्टनरसोबत जास्त वेळ घालवणं पसंत करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत पार्टनरचा सल्ला हवा असतो. ते आपल्या पार्टनरला खूप जपतात. आयुष्यातील सर्व मोठ्या निर्णयांमध्ये तो आपल्या पत्नीचा सल्ला नक्कीच घेतो. आपल्या पत्नीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

A या नावाने सुरू होणारी मुलं आपल्या पत्नीला खूप मानतात. त्यांचं आपल्या पत्नीवर खूप जास्त प्रेम असतं. तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याकडे या अक्षराच्या नावाच्या मुलांचा कल असतो.  समाजात आपल्या पत्नीच्या सन्मानाची तो खूप काळजी घेतात. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. 

N नावाने सुरू होणारी मुलं पत्नीला खूप मदत करतात. पत्नीच्या निर्णयाचा आदर करतात आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अशी मुले आपल्या पत्नीला सर्व सुख देण्याचा प्रयत्न करतात. या नावांची मुले त्यांच्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती असल्याचे सिद्ध करतात.

P नावाने सुरू होणाऱ्या मुलांचा स्वभाव खूप कोमल असतो असं म्हटलं जातं. काही वेळा पत्नीला राग, राग येऊनही तो शांत राहतो. असे लोक आपल्या पत्नीवर बिनशर्त प्रेम करतात आणि तिला कधीही दुःखी पाहू शकत नाहीत. असे लोक आपल्या पत्नीच्या सुखासाठी स्वतःला कोणत्याही संकटात टाकण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.Source link

Leave a Reply