Headlines

वयाच्या 46 व्या वर्षीही Ameesha Patel दिसते खूपच HOT!; फोटो व्हायरल

[ad_1]

Ameesha Patel: अमिषा पटेल या अभिनेत्री एकेकाळी बॉलीवूड गाजवले आहे. अभिनेता ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल यांची जोडी वीस वर्षांपुर्वी आलेल्या कहो ना प्यार हैं (Kaho Naa Pyaar Hai) या चित्रपटातून गाजली होती. मध्यंतरी बॉलीवूडपासून ब्रेक घेतलेल्या अमिषानं आता पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचं ठरवलं आहे. अमिषा पटेल सोशळ मीडियावरही खूप सक्रिय असते आणि नुकतेच तिचे बिकीनीतले फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून वयाच्या 46 व्या वर्षीही अमिषा खूप हॉट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. (bollywood actress ameesha patels bikini photos goes viral netizens reacts gh)

अमिषा पटेल सध्या बहरीनमध्ये आहे आणि तिथून तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत जे व्हायरल झाले आहेत. (Ameesha Patel Bikini Photos) व्हायरल होत असलेल्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. विशेष म्हणजे 46 वर्षीय अमीषा या व्हिडिओंमध्ये हिरव्या रंगाची टू-पीस बिकिनी परिधान करताना दिसली असून या वयातही किती हॉट दिसते यावर चाहत्यांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे.

मात्र, या व्हिडिओवरून अमिषाला सोशल मीडिया यूजर्सकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले, ‘फ्लॉप हिरोईन, फ्लॉप कंटेंट.’ तर आणखी एका युजरने लिहिले, ‘सनी भाई ये सकीना भाभी क्या हो गया?’ अमिषाने ‘गदर’ चित्रपटात सकीनाची भूमिका साकारली होती. एकीकडे युजर्स अमिषाला ट्रोल करत असले तरी दुसरीकडे तिचे चाहतेही या पोस्टवर हार्ट इमोजी टाकत आहेत.

अमिषाने 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याचा पुढचा ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपटही सुपर-डुपर हिट ठरला. त्यानंतर अमीषानं करिअरमध्ये फक्त ‘हमराझ’ आणि ‘भूल भुलैया’ सारखे हिट चित्रपट केले. 2018 मध्ये सनी देओलसोबत ‘भैयाजी सुपरहिट’मध्ये ती दिसली होती आता अमीषा सनीसोबत ‘गदर 2’चे (Gaddar 2) शूटिंग करते आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *