Headlines

पत्नीसोबत Superstar अभिनेत्याचा Romance जगासमोर; ‘खुल्लमखुल्ला प्यार’ काय असतं ते इथे पाहून लक्षात येतंय

[ad_1]

मुंबई : आपल्या जोडीदारावर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही मागेपुढे न पाहणाऱ्या एका मोठ्या सेलिब्रिटीनं पुन्हा एकदा सर्वांनाच थक्क केलं आहे. तो चित्रपटांमध्ये निर्धास्त काम करत असतानाच या अभिनेत्याची पत्नी त्याच्या कुटुंबाची, मुलाबाळांची काळजी घेते. मुळात तीसुद्धा एक अभिनेत्री असूनही स्वखुशीनं मोठ्या प़डद्यापासून दूर राहते. 

अचानकच या जोडीबद्दल इतकं कौतुकाचे शब्द बोलण्यामागचं कारण म्हणजे ही जोडी नुकतीच त्यांच्या सुट्टीवरून परत आली आहे. पॅरिसमधून परतत असताना तिकडच्या आठवणींना अधोरेखित करत या अभिनेत्यानं पत्नीवरचं प्रेम व्यक्त केलं. 

हा अभिनेता म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू. त्याची पत्नी, नम्रता शिरोडकर हिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ही मंडळी पॅरिसमधून निघताना दिसत आहेत. (South indian star Mahesh Babu wraps up Paris with kissing wife Namrata see photo )

निघत असतेवेळीच फोटो घेण्यासाठी म्हणून या मंडळींनी सेल्फी कॅमेरा सुरु केला आणि तितक्यातच अभिनेत्यानं पत्नीला Kiss केलं. 

पतीनं अचानत मागून येत किस केल्याचं पाहत काहीसा लाजरा आनंद नम्रताच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 

एक सुरेख जोडी, प्रेक्षकांना कायम हवंहवंसं वाटणारं कपल म्हणून महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्याकडे पाहिलं जातं. 

महेशबाबू मोठा पडदा गाजवत असला तरीही तो कायमच पत्नीचे आभार मानताना आणि तिच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसतो. सहजीवनाची ही वाट अशीच तर चालायची असते. 

दोघांची मेहनत, प्रेमाची जोड आणि आहे ते स्वीकारच जगण्याचं कसब… बस्स, मग काय तुमचीही जोडी सुपरहिट झालीच म्हणून समजा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *