Headlines

‘पत्नी किंवा आई होण्याच्या लायक नाहीस…’, Sukesh Chandrashekhar प्रकरणावर ट्रोल करणाऱ्या उर्फीला अभिनेत्रीने सुनावलं

[ad_1]

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चाहत खन्ना आणि उर्फी जावेद यांच्यात असलेली कॅटफाईट ही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. उर्फी आणि चाहत एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. कॉनमन सुकेश चंद्रशेखर विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्यासोबत चाहतचं नाव देखील समोर आलं आहे. अशात उर्फीनं चाहतची खिल्ली उडवताच चाहतनं तिला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे त्या दोघांच्या वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 

चाहतनं सुकेशची तुरुंगात भेट घेतली होती आणि त्याच्याकडून मौल्यवान भेटवस्तूही घेतल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर उर्फीने चाहतवर कमेंट केली. चाहत रागाने उर्फीला दीदी म्हणाली, तर उर्फी चाहतला आंटी म्हणाली. उर्फीने चाहतला गोल्ड डिगरही म्हटले. आता चाहतने उर्फीला सडेतोड उत्तर दिले आहे. 

आणखी वाचा : Badshah च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, रॅपरच्या पोस्टमुळे एकच खळबळ

चाहतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत चाहतं म्हणाली, ‘सत्य जाणून न घेता प्रसिद्धीसाठी या सगळ्या प्रकरणात बोलणं म्हणजे सगळ्यांसमोर स्वतःला मूर्ख असल्याचे दाखवत आहात. ब्रेनलेससोबत काय वाद घालायचा. हुशार असती तर तिनं काम केल असतं किंवा शूट केलं असतं, सेमी न्यूड स्पॉट केलं नसतं. चल जाऊदे, तू तर काकू, पत्नी किंवा आई होण्याच्याही लायक नाहीस, तर आता दुसऱ्यांना काकू बोल आणि खूश रहा. अल्लाह तुला बुद्धी देओ. #javed’  चाहतची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

आणखी वाचा : पोटच्या मुलांना पाहून ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली ‘So embarrassing’, कारण…

Sukesh Chandrashekhar Money Laundering case chahatt khanna urfi javed Jacqueline fernandez Nora Fatehi nikki tamboli

आणखी वाचा : जर तू जीन्स घातलीस तर…’, राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच…

उर्फीच्या कोणत्या वक्तव्यावर चाहतनं उत्तर दिले?

‘मी सॉरी तुझ्या घटस्फोटाबद्दल बोलल्यामुळे  म्हटलं होतं. एका अनोळखी व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू घेण्यासाठी तुरुंगात जाण्यासाठी मी तुला सॉरी का म्हणेन? स्वत: ची लाज काढणं बंद कर. तू माझ्या कपड्यांवर कमेंट  केलीस, तर तू स्वत: पैसे घेण्यासाठी तुरुंगात एका अनळोखी व्यक्तीला भेटलीस. हनी, कॉम्पीटीशनचं नाही’, असे उर्फी म्हणाली होती. 

आणखी वाचा : साप पकडण्याचं धाडस करु नका, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम, पाहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

पुढे उर्फी म्हणाली, ‘पण हो, मला माफ कर. मला वाटलं की माझ्यासोबत असलेला वाद हा तुझ्या करिअरचा हायलाइट पॉइंट असेल, पण या वादाला कोणीही हरवू शकत नाही. तू नेहमी गोल्ड डिगर म्हणून ओळखली जाशील आणि मी विचित्र कपडे परिधान करणारी मुलगी म्हणून ओळखली जाईल. नंतरचं चांगल आहे. 

आणखी वाचा : बबीताला ‘या’ व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

दरम्यान, सुकेशच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला आज पुन्हा एकदा EOW ऑफिसमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. जॅकलिनसोबत फॅशन डिझायनर लिपाक्षी देखील आज सकाळी 11 वाजता ईओडब्ल्यू कार्यालयात चौकशीसाठी पोहोचतील.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *