WI vs IND, 1st ODI : शिखर धवन नर्व्हस नाइंटीचा शिकार, तरीही रचला मोठा विक्रम


मुंबई : वेस्टइंडीज विरूद्धचा पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन नर्व्हस नाइंटीचा शिकार ठरला आहे. अवघ्या तीन धावा करण्याआधीच त्याच शतक हुकल आहे. त्याने 97 धावांच्या खेळी केली. मात्र शतक हुकलं असलं तरी त्याने मोठा विक्रम केला आहे.  

नामी संधी हुकली 
शिखर धवनने 99 बॉलमध्ये 97 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. शिखर धवनने तीन वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं असतं. मात्र तो नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला. त्याचे शेवटचे शतक 2019 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. शतक झळकावल्यानंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या बॅटमधून 9 अर्धशतके आली, पण त्याला एकही शतक झळकावता आले नाही. 

अनोखा विक्रम 
भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो सर्वात वयस्कर कर्णधार ठरलाय.   धवनने 36 वर्षे 229 दिवस वयात अर्धशतक ठोकून मोहम्मद अझरुद्दीनचा 23 वर्ष जुना विक्रम मोडला. अझहरने 1999 मध्ये वयाच्या 36 वर्षे 120 दिवसात अर्धशतक केले होते.

सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा शिकार 
शिखर धवन वनडेमध्ये सहाव्यांदा 90 आणि 99 च्या स्कोअरमध्ये बाद झाला आहे. तसेच तो एकदा 97 धावांवर नाबाद राहिला आहे. भारतीय फलंदाजांमध्ये फक्त सचिन तेंडुलकर (18) आणि मोहम्मद अझरुद्दीन (7) हे त्याच्यापेक्षा 90 ते 99 वेळा जास्त वेळा बाद झाले आहेत. 94 ते 98 दरम्यान प्रत्येक स्कोअरवर तो बाद झाला आहे.Source link

Leave a Reply