Whatsapp वर फोटो पाहून प्रेमात पडला, चोरून 2 वर्ष एकमेकांना डेट आणि…


मुंबई : एखाद्या सिनेमापेक्षाही टीम इंडियाच्या खेळाडूची लव्हस्टोरी काही कमी नाही. Whatsapp वर फोटो पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर सुरू झाली त्यांची लव्हस्टोरी. एकमेकांना 2 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी विवाह केला. 

भारतीय क्रिकेट टीममधील ऑलराऊंडर कृणाल पांड्या आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो नेहमी आपल्या पत्नी आणि भावामुळे सोशल मीडियावरही तुफान चर्चेत असतो. कृणाल पांड्या आणि पंखुडीची लव्हस्टोरी तर खूपच भारी आहे. 

पहिल्या नजरेत प्रेम होतं जे म्हणतात ते कृणाल आणि पंखुडीच्या बाबतीत अगदी खरं ठरलं आहे. कृणालने तिचा फोटो व्हॉट्सअॅपला पाहिला आणि त्याच क्षणी तिच्या प्रेमात पडला. तर पंखुडी देखील पहिल्याच नजरेत कृणालवर भाळली. पंखुडी आणि कृणाल यांच्यातील संपर्क वाढला. 

कृणाल आणि पंखुडी एकमेकांना चोरून 2 वर्ष डेट करत होते. त्यांनी 27 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं. पंखुडी मार्केटिंग एक्स्झिकेटिव्ह आणि एक बड्या व्यावसायिकाची मुलगी आहे. 

कृणाल पांड्याने 4 नोव्हेंबर 2018 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कृणालच्या फ्रेण्डमुळे पंखुडीची ओळख झाली होती. पंखुडी कृणालवर वेड्यासारखं प्रेम करत होती. कृणाललाही तिचे फोटो पाहताच क्षणी पहिल्या नजरेत प्रेम झालं. 

पहिल्यांदा Whatsapp वर फोटो पाहिल्यानंतर कृणालने तिला भेटण्याचं मनाशी पक्क केलं. फ्रेंण्डने त्यांच्या भेटीचं स्थळ पक्क केलं. पहिल्यांदाच भेट झाल्यानंतर दोघंही एकमेकांना आवडले तिथून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. 

2017 मध्ये कृणाल पांड्याला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. त्यानंतर त्याने पंखुडीला लग्नासाठी प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. त्याने एका हातात ट्रॉफी आणि दुसऱ्या हातात लाल गुलाब घेऊन पंखुडीला लग्नासाठी मागणी घातली. 

27 डिसेंबर 2017 मध्ये या दोघांनी लग्न केलं. नीता अंबानी, सचिन तेंदुलकर सारख्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. कृणाल आपल्या पत्नीसोबतचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचे 466K फॉलोअर्स आहेत. Source link

Leave a Reply