Headlines

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

[ad_1]

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप आणि फेसबुकचे मेसेंजर ओपन करावे लागतात. या दोन्ही ॲपचे नोटिफिकेशन्स सुद्धा सातत्याने येत असतात. परंतु, कधी कधी याच नोटिफिकेशन्समुळे वैताग येतो. अचानक फोनचे नोटिफिकेशन वाजते आणि तुमची एकाग्रता नष्ट होते. त्यामुळे अनेक जण याला वैतागतात. तुम्हाला जर अशा नोटिफिकेशन्सचा वैताग आला असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स सांगणार आहोत, याच्या मदतीने तुम्ही याला म्यूट करू शकता, जाणून घ्या डिटेल्स. WhatsApp किंवा Messenger ला म्यूट करण्याची सोपी ट्रिक समजून घ्या.

Messenger वर चॅटला म्यूट करण्याची ट्रिक

स्टेप १ – आपल्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक मेसेंजर ॲप वर जा. त्यानंतर चॅटवर जा. ज्याला तुम्हाला म्यूट करायचे आहे.
स्टेप २ – आता या चॅटवर लाँग प्रेस करा. यात म्यूट नोटिफिकेशन्सचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप ३ – आता तुम्हाला म्यूट मेसेज नोटिफिकेशन्स, म्यूट कॉल नोटिफिकेशन्स, म्यूट मेसेज आणि कॉल नोटिफिकेशन्स सारखे काही ऑप्शन दिसतील.

स्टेप ४ – यात कोणत्याही मेसेजला सिलेक्ट केले जावू शकते. तसेच फेसबुक मेसेंजरवर मेसेज किंवा कॉल्सचा आवाजाचे नोटिफिकेशपासून सुटका करता येवू शकते.

याशिवाय, मेसेंजर वर आणखी एक ऑप्शन येतो. याचे नाव आहे इग्नोर मेसेज. या ऑप्शनसाठी चॅटवर लाँग प्रेस दाबायचा असतो. जर यूजर या ऑप्शनचा वापर करीत असेल तर यूजरला कोणतेही नोटिफिकेशन मिळणार नाही. किंवा पाठवलेले मेसेज डिलिव्हर होणार नाहीत. ज्यावेळी तुम्ही कोणत्याही चॅटला ओपन कराल. त्यावेळी आधीचे मेसेज पाहू शकता.

वाचाः Samsung Galaxy Buds 2 Pro लाँच, फीचर्स पाहताच तुम्हीही म्हणाल बेस्टच ! जाणून घ्या किंमत

WhatsApp चॅट्सला कसे म्यूट कराल

स्टेप १ – WhatsApp ला ओपन करा. त्या चॅटवर जा. ज्याला तुम्हाला म्यूट करायचे आहे.
स्टेप २ आता या चॅटवर टॅप करा. तुम्ही म्यूट ऑप्शन पाहू शकता. जे डिलिट ऑप्शन जवळ दिसेल.
स्टेप ३ – म्यूट ऑप्शनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. एक तास, एक आठवडा आणि ऑलवेज.
स्पेट ४ – ऑलवेज वर टॅप केल्यानंतर नेहमीसाठी चॅट म्यूट होईल.

वाचाः ८ जीबी रॅमसह Moto G62 स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, पहिल्याच सेलमध्ये मिळेल हजारो रुपयांची ऑफर

Messenger आणि WhatsApp शिवाय, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मला सुद्धा म्यूट मेसेज आणि म्यूट कॉलचे ऑप्शन मिळते. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर म्यूट मेसेज आणि कॉलची पद्धत जवळपास Messenger आणि WhatsApp सारखीच आहे.

वाचाः 5G सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालायला येतोय खूपच कमी किंमतीचा Redmi चा स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *