Headlines

Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या ‘या’ चित्रपट, Web Series चा आनंद

[ad_1]

OTT Movies and Web series : आज प्रत्येक व्यक्ती सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तयार (Weekend Mode) आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या असताना कोणते चित्रपट किंवा सीरिज पाहायला हवी हा विचार करण्याच किंवा सर्च करण्यात आपला बराच वेळ जातो. दरम्यान, जर तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर अभिनेता आयुष्मान खुरानाचा अॅन अॅक्शन हीरो (An Action Hero) आहे. जर तुम्हाला ओटीटीवर चित्रपट किंवा सीरिज पाहायची असेल तर त्यात कार्तिक आर्यन स्टारर फ्रेडी, अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर गुडबाय, बाबिल खानचा डेब्यू फिल्म काला असे अनेक ऑप्शन आहेत. 

लव्ह टुडे (Love Today)
4 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’ आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका शॉर्ट फिल्मवर आधारीत असून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. 

इंडिया लॉकडाऊन (India Lockdown)
इंडिया लॉकडाउन हा वास्तव दाखवणारा आणखी एक चित्रपट आहे. हा चित्रपट भारतातील कोव्हिड-19 महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या सगळ्या गोष्टींविषय भाष्य करणारा आहे. या चित्रपटात प्रतीक बब्बर (Prateik Babbar), श्वेता बसू प्रसाद (Shweta Basu Prasad), आहाना कुमरा (Aahana Kumra), सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रकाश बेलावाडी (Prakash Belawadi) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट तुम्ही ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

कैसी ये यारियां S4 (Kaisi Yeh Yaariaan S4)
कॉलेजचं आयुष्य कसं असतं हे आपल्या सगळ्यांना ज्या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळालं. त्या वेब सीरिजचा 4 था सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता पार्थ समथान (Parth Samthaan) आणि अभिनेत्री निती टेलर (Niti Taylor) त्यांच्या लोकप्रिय शो ‘कैसी ये यारियां’ च्या 4 थ्या सीझनची प्रतिक्षा संपली आहे. ही सीरिज तुम्ही Voot या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

फ्रेडी (Freddy)
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan)  फ्रेडी सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या भूमिकेसाठी कार्तिकनं 14 किलो वजन वाढवलं होतं. फ्रेडी हा चित्रपट डॉ फ्रेडी गिनवालाच्या यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात अलाया एफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट तुम्ही Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

गूडबाय (Goodbye) 
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा चित्रपट ‘गुडबाय’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. दरम्यान, चित्रपट OTT वर पाहण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट एका कुटुंबाविषयी आहे, ज्यात नीतू कपूर (Neetu Kapoor), सुनील ग्रोव्हर (Sunil Grover), पावेल गुलाटी (Pavail Gulati), आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi), एली अवराम (Elli AvrRam) , साहिल मेहता (Sahil Mehta), शिविन नारंग (Shivin Narang), शायंक शुक्ला (Shayank Shukla), नवोदित अभिषेक खान (Abhishekh Khan) आणि अरुण बाली (Arun Bali) यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

Qala 

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल Qala या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी (Triptii Dimri), स्वस्तिका मुखर्जी (Swastika Mukherjee), अमित सियाल (Amit Sial), नीर राव (Neer Raao), अविनाश राज शर्मा (Avinash Raj Sharma) आणि आशिष सिंग (Ashish Singh) यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 1930 आणि 1940 मध्ये लोकप्रिय असलेल्या एका प्लेबॅक सिंगरची कहाणी आहे की कशा प्रकारे यशस्वी होते, मात्र त्यानंतर तिचं तिच्या आईशी असलेलं नात आणि मग तिला झालेल्या अनेक समस्यांविषीय दाखवण्यात आलं आहे. 

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तर हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहून विकेंडचा आनंद नक्कीच घ्या…



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *