Headlines

Virat Kolhi: मैदानात चाहते शुभमनला ‘सारा भाभी’ आवाज देत चिडवत असताना विराटने केलं असं काही…; VIDEO व्हायरल

[ad_1]

Virat Kolhi Reaction on Shubhman Gill: न्यूझीलंडविरोधात (New Zeland) झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने व्हाईटवॉश देत आयसीसी टीम रँकिंगमध्ये (ICC Team Ranking) अव्वल स्थान पटकावलं आहे. 24 जानेवारी इंदोरमधील होळकर मैदानात तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. भारताने हा सामना 90 धावांनी जिंकला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubhman Gill) केलेल्या शतकांच्या जोरावर भारताने 385 धावसंख्या उभी केली होती. न्यूझीलंड संघ मात्र 295 धावाच करु शकला. दरम्यान भारताच्या विजयासह शुभमन गिलही यावेळी चांगलाच चर्चेत होता. याचं कारण म्हणजे शुभमन मैदानात क्षेत्ररक्षण करत असताना चाहते त्याला सारा नावाने चिडवत होते. 

हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअममध्येही चाहत्यांनी शुभमनला सारा नावाने चिडवत होते. त्यानंतर इंदोरमध्ये पुन्हा एकदा हा प्रकार पाहण्यास मिळाला. ‘हमाऱी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो’ अशा घोषणाच चाहते देत होते. यावेळी मैदानात उपस्थित विराट कोहलीला या घोषणा ऐकून हसू अनावर होत होतं. इतकंच नाही तर तो चाहत्यांना अजून जोरात घोषणा देण्यास सांगत होता. 

इंदोरमधील सामन्यादरम्यान शुभमन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चाहते साराच्या नावाने आवाज देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता या घोषणा ऐकून विराट कोहलीने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

शुभमन गिल सारा तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्यापही यावर कोणीही अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. शुभमन गिलला अनेकदा सारा अली खानसहितही पाहण्यात आलं आहे. 

न्यूझीलंडविरोधातील मालिकेत शुभमन गिलने चांगली कामगिरी केली असून तीन सामन्यांत 360 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. हैदराबामध्ये त्याने द्विशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला आहे. दुसरीकडे कोहली मात्र मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. तीन सामन्यात तो फक्त ५५ धावा करु शकला. 

एकदिवसीय सामन्यानंतर आता दोन्ही संघ टी-२० सामन्यात भिडणार आहेत. टी-२० साठी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तसंच पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *