Headlines

विराट कोहलीकडून ऋषभ पंतचा अपमान… Video होतोय व्हायरल, नेटकरी संतापले

[ad_1]

Team India : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या काही महिन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ बंद झाला होता. पण आता पुन्हा विराट आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय टीम (Team India) टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) ऑस्ट्रेलियात (Australia) दाखल झाली आहे. टी20 वर्ल्ड कप आधी विराट फॉर्ममध्ये आल्याने चाहतेही खूश आहेत. पण त्याआधी सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 

विराटने ऋषभकडे केलं दुर्लक्ष
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विराट कोहली ऋषभ पंतला (Rishabh Pant) दुर्लक्षित करताना दिसतोय. हा व्हिडिओ एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेदरम्यानचा आहे. एशिया कपमध्ये शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा (Afghanistan) धुव्वा उडवला होता. या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा हिरो होता विराट कोहली. सामन्यात विराट कोहलीने टी20 क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं शतक ठोकलं होतं आणि संघाला शानदार विजयही मिळवून दिला होता. या विजयानंतर सर्व खेळाडू एकमेकांना हात मिळवत शुभेच्छा देत होते. यावेळी ऋषभने शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला, पण विराटने हात मिळवायचं सोडा, ऋषभकडे लक्षही दिलं नाही. 

व्हिडिओत आपण पाहू शकतो विराटने आधी केएल राहुलशी (KL Rahul) हात मिळवला, पण त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतशी हात न मिळवताच तो पुढे गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर क्रिकेट चाहत्यांनी विराटच्या वागणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओतही ऋषभ पंत टीमपासून काहीसा दूर रहाताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या गेलेल्या मालिकेनंतरचा आहे. मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू ट्रॉफी उंचवात जल्लोष करताना दिसत आहेत. पण पंतचा चेहरा पडलेला आणि एका कोपऱ्यात उभा राहिलेला दिसतोय. 

टी20 वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश आहे. पण अंतिम अकरामध्ये ऋषभला कितपत संधी मिळते याबाबात प्रश्न आहे. कारण दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्मात आहे आणि बेस्ट फिनिशर म्हणून त्याने गेल्या काही सामन्यात स्वत:ला सिद्ध केलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *