Virat Kohli | विराट कोहलीचा फ्लॉफ शो कायम, चाहत्यांची पुन्हा निराशा


मुंबई : विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची निराशा केली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 39 वा सामना बंगळुरु विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात विराट 9 धावा करुन आऊट झाला. विराट पुन्हा अपयशी झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. (rr vs rcb ipl 2022 virat kohli again disappointing to fans out on 9 runs against rajasthan royals riyan parag take classic catch)

विराटला सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्येच प्रसिध कृष्णाने रियान परागच्या हाती कॅच आऊट केलं. युवा रियानने चांगला कॅच घेत विराटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विराटने 10 बॉलमध्ये 2 चौकारांसह 9 धावा केल्या.

विराटची 15 व्या केलेल्या धावा

विराटला आयपीएलच्या 15 व्या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विराट सातत्याने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलाय. तर काही वेळा त्याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला त्याचं मोठ्या आकडेवारीत रुपांतर करता आलं नाही. विराटने या मोसमात आतापर्यंत एकूण 8 सामन्यात अनुक्रमे  41*, 12, 5, 48, 1, 12, 0, 0 आणि 9 अशा धावा केल्या आहेत.

विजयासाठी 145 धावांचे आव्हान

दरम्यान राजस्थानने आरसीबीला विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने नाबाद 56 धावांची खेळी केली.

तर कॅप्टन संजू सॅमसनने 27 धावांचं आव्हान दिलं. आर अश्विनने 17 रन्स केल्या. डॅरेल मिचेलने 16 धावा जोडल्या. तर आरसीबीकडून मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड आणि वानिंदू हसरंगा या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर प्लेइंग इलेव्हन : फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वानिन्दु हसरंगा, जोश हेजलवुड आणि मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल,  शिमरोन हेटमायर, रियान पराग, डेरिल मिचेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा आणि युजवेंद्र चहल.Source link

Leave a Reply