रुग्णालयात बेडवर दिग्गज अभिनेत्रीने दिला आयुष्यातील अखेरचा शॉट


मुंबई : आयुष्याचं गणितचं वेगळं असतं. कधी काय होईल सांगता येत नाही. झगमगत्या विश्वात असे अनेक किस्से आहेत, जे फार कमी लोकांना माहिती आहेत, तर काही लोकांना याची कल्पना देखील नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकारांना आयुष्यात कितीही संकटांचा सामना करावा लागत असेल तरी कॅमेऱ्यासमोर कायम हसतमुख राहावं लागतं. प्रकृती ठिक नसेल तरी काम करावं लागतं. असचं काही झालं आहे, दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांच्यासोबत.

मीना कुमारी यांनी अनेक हीट सिनेमांतून चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण एक दिवस असा आला जेव्हा त्यांना रुग्णालायातील बेडवर आयुष्यातील शेवटचा सीन शूट करावा लागला…

ही घटना आहे मीना कुमारी यांच्या ‘दुश्मन’ सिनेमातील. सिनेमांच शूट जवळपास पूर्ण झाला होतं. पण शुटिंग दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते मीना यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले. तेव्हा ते मीना यांना म्हणाले, ‘काही हरकत नाही, सर्व काही ठिक होईल. फक्त एक शॉट  आहे, ज्यामध्ये अडचण येवू शकते. त्या शॉटमध्ये तुम्हाला नवरी बनवायचं होतं….’

निर्मात्यांचं मुद्द्यावर मीना यांनी रुग्णायलात शूटिंग पूर्ण करू असं सांगितलं, त्या म्हणाल्या, ‘आयुष्याचं काही सांगता येत नाही, नंतर काही होईल मला देखील माहिती नाही, मी रुग्णालयाकडून परवानगी घेते आणि आपण शुटिंग करू…’

परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात बेडवर नवरीच्या रुपात आयुष्यातील शेवटचा शॉट दिला. त्यानंतर काही दिवसांतचं त्यांचं निधन झालं. नवरीच्या भूमिकेत केलेलं शूट त्यांच्या आयुष्यातील शेवटचं शूट होतं. Source link

Leave a Reply