Headlines

Vastu tips for 2023 : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरात आणा ‘या’ वस्तू; पैशांची जाणवणार नाही चणचण

[ad_1]

Vastu tips for 2023 : नवीन वर्ष 2023 हे प्रत्येकासाठी आनंदी, भरभराटीचं आणि प्रगतीचं जावं असं वाटतं. त्यासाठी प्रत्येक जण अनेक संकल्पना, ध्येय आणि काही नियम ठरवतात. वास्तूशास्त्रातही काही उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्हाला वाटतं 2023 हे वर्ष तुमच्यासाठी शुभ आणि भाग्यशाली असावं, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घरातमध्ये काही वस्तू नक्की आणा. त्यामुळे तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असेल आणि गणपती बाप्पाचे आशिर्वाद राहितील. (vastu tips for 2023 bring these things  at home before the start new year)

‘या’ वस्तू नक्की आणा

1. गोमती चक्र

गोमती चक्र हे भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राचं छोटं स्वरूप मानलं जातं. हे घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 

2. दक्षिणावर्ती शंख

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी दक्षिणावर्ती शंख आपल्या घरी नक्की आणा यामुळे लक्ष्मीची तुमच्या घरावर कायम कृपा राहते, असं वास्तूशास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे ते खरेदी करून घरी ठेवल्यानंतर शुभ मुहूर्तावर त्याची पूजा करावी आणि नंतर लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावी.

3. लाफिंग बुद्ध

फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धा विशेष महत्त्व आहे. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने समृद्धी येते आणि प्रगती होते असं म्हणतात. 

4.चांदीचा हत्ती 

चांदीचा हत्ती घरातील नकारात्मक गोष्टी काढून टाकतो आणि घरात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढतो. 

5. मोराचे पंख 

धनसंपत्तीचं प्रतिक म्हणजे मोराची पिसे. त्यामुळे घरात मोराची पिसे एक किंवा तीनच ठेवावीत. जर त्यापेक्षा जास्त ठेवल्यास वास्तूशास्त्रानुसार ते अशुभ मानलं जातं. 

6. शमी रोप 

नवीन वर्षाच्या दिवशी घरात शमीचं रोप लावा, यामुळे घरातील वास्तुदोष दूर नाहीसे होतात. 

7. कासव 

दुकानात भरभराटीसाठी तुम्ही कासव ठेवलेला पाहिला असेल. तसंच तो घरात ठेवल्यास सुख-समृद्धी नांदते. चांदी, लाकूड किंवा पितळ कसालही कासव घरात आणा आणि तुमचं नशिबाचे दरवाजे उघडा. 

8. आवळा आणि तुळशीचे रोप घरात आणा

आवळा किंवा तुळशीचे रोप हे घरातल आणलं की नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव वाढवतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *