Headlines

कोणाला रस्त्यावर मारलं, तर कोणाच्या चेहऱ्यावर Acid फेकलं; प्रसिद्ध अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू

[ad_1]

Actress Death : कलाविश्वातील अशा काही घटना आहेत ज्या आजही ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण, त्यांच्यातील वाद, अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्येचा घेतलेला निर्णय… आजही चर्चेत आहेत. पाकिस्तानच्या सिनेविश्वातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कायम चर्चेत राहिल्या. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू. पाकिस्तानमध्ये काही अभिनेत्रींवर रस्त्यावर गोळीबार केला तर, काही अभिनेत्रींवर Acid फेकलं. ज्यामुळे त्याचं निधन झालं. जाणून घ्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या दुर्दैवी मृत्यूबाबत. 

निग्गो 
लाहोरचा एक प्रसिद्ध रेड लाइट एरिया ज्याला शाही मोहल्ला म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही सिनेमाप्रेमी असाल तर ‘शाही मोहल्ला’ हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. सध्या बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भंसाळी या मोहल्ल्यावर आधारित वेब सीरिज तयार करत आहेत.  पाकिस्तानमधील अनेक दिग्दर्शकांनी शाही मोहल्ल्यातील मुलींचं कौशल्य पाहून त्यांनी सिनेमात काम करण्याची संधी दिली. (pakistani actress name)

शाही मोहल्ल्यातून आलेल्या मुली एका रात्रीत स्टार झाल्या. अशाच मुलींपैकी एक म्हणजे अभिनेत्री निग्गो उर्फ ​​नर्गिस बेगम. अनेक सिनेमांमध्ये मुजरा करून निग्गोने अनेकांचं मन जिंकलं. निग्गो निर्माता ख्वाजा मजहरच्या प्रेमात पडली. त्यांनंतर दोघांनी लग्न केलं. (pakistani actress life style)

पण निग्गो आणि मजहर यांचं लग्न अभिनेत्रीच्या कुटुंबाला मान्य नव्हतं. जर कोणी शाही मोहल्ल्यातील मुलीसोबत लग्न करत असेल तर त्या मुलाला त्यासाठी पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे निग्गोचे घरातले तिला पुन्हा बोलवत होते. पण प्रेमामुळे निग्गो पुन्हा शाही मोहल्ल्यात जाण्यास तयार नव्हती. (pakistani actress life)

अखेर आई आजारी आहे, असं सांगत निग्गोला शाही मोहल्ल्यामध्ये बोलावण्यात आलं. त्यानंतर निग्गो आईला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर निग्गो पुन्हा पतीच्या घरी येण्यास तयार नव्हती. अखेर मजहरने तिला बोलावण्यासाठी म्यूझिक दिग्दर्शक मंजूर अशरफ यांना पाठवलं. पण त्यांचं देखील निग्गोने ऐकलं नाही. शेवटी निग्गोची गोळी मारुन हत्या करण्यात आली. या गुन्ह्यमुळे मजहरला जन्मठेपेची शिक्षा झाली. (pakistani actress love life)

नादिरा
नादिराने एक दोन नाही तब्बल 8 वर्ष पाकिस्तानी कलाविश्वात राज्य केलं. पंजाबी, उर्दू कलाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या नादिराने पतीसोबत नवीन व्यवसाय सुरु केला. दोघांनी मिळून सुरु केलेल्या व्यवसायामुळे दोघांमध्ये वाद होवू लागले. तेव्हा  एका हॉटेल मधून बाहेर निघताच नादिरावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी कधीही चौकशी झाली नाही. 

यास्मिन खान
अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री यास्मिन खानचा दुर्दैवी अंत झाला. पश्तो सिनेमातील अश्लीलता पाहून ती अभिनयापासून दूर झाली. दोन लग्न अपयशी झाल्यानंतर यास्मिनने श्रीमंत घराण्यातील मुलगा अरिफुल्लासोबत लग्न केले.  पण तिच्या कुटुंबीयांनी तिला कधीच स्वीकारले नाही.

लग्नानंतर यास्मिला कळालं अरिफुल्लाचं पहिलं लग्न झालं होतं. अरिफुल्लाच्या सवयी पाहून त्याच्या कुटुंबाने देखील त्याला नाकारलं. पण यास्मिनने पतीला सुधारण्याचा प्रयत्न केला. पण अखेर असं करणं यास्मिनला महागात पडलं. यास्मिनत्या प्रयत्नांना कंटाळून अरिफुल्ला तिची हत्या केली. दोन दिवस यास्मिनचं मृतदेह घरात होतं. 

अंदलीब
पाकिस्तानी अभिनेत्री अंदलीबला उद्योगपती हनीफ गुमानसोबत असलेलं नातं महागात पडलं. हनीफ गुमानसोबत असलेल्या नात्यातून अभिनेत्रीला बाहेर पडायाचं होतं. त्यासाठी तिने प्रयत्न देखील केले. पण जेव्हा हनीफ गुमानच्या हे लक्षात आलं तेव्हा त्याने अंदलीबच्या चेहऱ्यावर acid फेकून तिची हत्या केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *