Headlines

युक्रेन संकटावर नवी रणनीती, मोदी सरकारमधील 4 मंत्री ‘विशेष दूत’ बनून जाणार

[ad_1]

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने नवी रणनीती आखली आहे. याअंतर्गत चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जाणार आहे. त्यानंतर हे मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांशी बोलून त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना भारताचे ‘विशेष दूत’ म्हणून पाठवले जाणार आहे.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील उपस्थित होते.

कोणते मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार ?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग हे इव्हॅक्युएशन मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांना भेट देतील.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधिया रोमानिया आणि मोल्दोव्हाला जाणार आहेत. किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला आणि व्हीके सिंग पोलंडला जाणार आहेत.

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. सध्या रशियाला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घ्यायची आहे, पण त्यात यश आलेले नाही. सोमवारी सकाळीही तेथे स्फोटांचे आवाज ऐकू आले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केली आहे. याअंतर्गत सहावे विमानही भारतात दाखल झाले आहे. या अंतर्गत 240 भारतीय दिल्लीत परतले आहेत. ते बुडापेस्ट, (हंगेरी) मार्गे भारतात पोहचले आहेत. यापूर्वी सोमवारी सकाळी पाचवे विमान भारतात आले होते. यामध्ये २४९ भारतीय नागरिकांना आणण्यात आले आहे. हे विमान खरेस्ट (रोमानिया) येथून निघाले होते. भारतात आल्यानंतर एका विद्यार्थ्याने सांगितले की, ‘आम्ही परत आलो आहोत त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. युक्रेनमध्ये आमच्यासाठी परिस्थिती खूप कठीण होती, आम्ही हताश झालो होतो



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *