Headlines

“उद्या ब्लू फिल्म टाकून…”; नाना पटोले कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी रुपाली पाटील चित्रा वाघांवर संतापल्या | NCP Rupali Patil Thombare criticize Chitra Wagh over viral video of Nana Patole pbs 91

[ad_1]

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला. तसेच ट्विटरवर नाना पटोले यांना टॅग करत “नाना तुम्ही पण झाडी, डोंगर, हॉटेलमध्ये” असा खोचक प्रश्न केला. या ट्वीटनंतर चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी “तुम्ही ब्लू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याचं उत्तर मागाल, असं करतात का” असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “महिला म्हणून राजकारणात काम करताना आपली जबाबदारी वाढते. आपण अधिक संवेदनशीलपणे वागलं पाहिजे. नाना पटोले यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल करावा. कुणालाही कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यातील व्हिडीओ टाकण्याचे अधिकार नाहीत. लग्न झालेलं जोडपे हनिमुनला गेले तर ते हातात हात घातल्याचे, जवळ उभे असल्याचे फोटो टाकतात. थेट हनिमुन होतानाचे व्हिडीओ टाकत नाही हे चित्रा वाघ यांनी लक्षात घ्यावं.”

“उद्या तुम्ही ब्लू फिल्म टाकाल”

“या गोष्टी पाळल्या पाहिजेत. उद्या तुम्ही ब्लू फिल्म टाकाल आणि याचं उत्तर द्या म्हणाल. ज्या महिलेवर अन्याय झाला आहे त्याची तपासणी करून तिला न्याय द्या. मात्र, राजकारणासाठी असं वागणं करू नये असं मी चित्रा वाघ यांना सांगेल,” असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.

“भाजपाच्या श्रीकांत देशमुखांचे बेडरुममधील बनियनवरचे व्हिडीओ आले”

रुपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या, “चित्रा वाघ या दुटप्पी भूमिका घेत आहेत. भाजपाच्या श्रीकांत देशमुख यांचे बेडरुममध्ये बनियनवर बसलेले असतानाचे व्हिडीओ आले. आम्ही त्याचं भांडवल केलं नाही. आमची नितिमत्ता जागी आहे. आम्हाला कायद्याचं ज्ञान आहे. कुणाच्या घरात वाकून पाहायचं, कोण बनियनवर बसलाय, कोण केस सोडून बसली आहे आणि कोण रडतंय यात आम्हाला रस नाही. त्याला राजकारण म्हणत नाही. त्याला न्याय म्हणत नाही.”

“तुम्हाला कुणाच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओ टाकण्याचा अधिकार नाही”

“आमची राजकारणातील नितिमत्ता जागी ठेवली आहे. चित्रा वाघ यांची नितिमत्ता, काम संपलं आहे. त्या केवळ विरोधकांबाबत बेताल वक्तव्य करत ओरडणे, व्हिडीओ व्हायरल करणे हे काम करत आहेत. त्यांच्या पक्षामुळे त्यांना हे काम करावं लागत आहे. त्यांनी असं करू नये, अन्यथा त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होतील. तुम्हाला कुणाच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओ टाकण्याचा अधिकार नाही,” असं ठोंबरे यांनी म्हटलं.

हेही वाचा : नाना पटोले महिलेसोबत असल्याचा दावा करणारा Video चित्रा वाघ यांनी केला पोस्ट; कथित व्हिडीओवर नाना म्हणाले, “हे प्रकरण…”

“समजा नाना पटोलेंनी त्या महिलेसोबत काही क्षण घालवले असतील तर…”

“व्हायरल व्हिडीओ त्यांचा आहे की नाही हे स्पष्ट नाही. मात्र, समजा नाना पटोलेंनी त्या महिलेसोबत काही क्षण घालवले असतील तर त्यांनी तुम्हाला का सांगावं. जर दोघांची संमती असेल तर तुम्ही विचारणाऱ्या कोण? चित्रा वाघ लोकांची घरं का बरबाद करत आहात? स्वतःचंही घर सावरा आणि इतरांचीही घरं सावरा. त्यांनी कायदेशीर वागावं एवढंच माझं सांगणं आहे,” असंही ठोंबरे यांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *