Headlines

“त्यांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं” नमिता थापरकडून बिग बींबाबत मोठं वक्तव्य

[ad_1]

मुंबई : द कपिल शर्मा शो हा टीव्हीच्या दुनियेतील असाच एक मनोरंजन कार्यक्रम आहे, जिथे सर्व सेलिब्रिटी भेट देत असतात. एखादा नवीन सिनेमा येणार असेल, तर त्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी ते कपिल शर्माच्या शोमध्ये येतात. हा एक मनोरंजक  शो आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा सिलेब्रिटींना खेळ किंवा एक्टिवीटी करायला लावतो. तसेच, त्यांना काही प्रश्न देखील विचारतो.

हल्लीच ‘शार्क टँक इंडिया’च्या जजेसने कपिल शर्माच्या शोला भेट दिली होती. ज्यामध्ये त्यांनी या शोवर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलं.

त्यावेळी शार्क टँक इंडियाची जज नमिता थापरने बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला. अमिताभ बच्चन यांच्यामुळे त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले, हे तिने सांगितले.

खरेतर नमिता थापर मेगास्टार अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे कपिल शर्माने तिला अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमाबद्दल प्रश्न विचारला. कपिल शर्मा नमिता थापरला म्हणाला की ती अमिताभ बच्चनची डाय-हार्ट फॅन होती, पण आता तिची संपत्ती पाहून बिगच तिचे फॅन झाले आहेत.

यावर नमिता थापर म्हणाली की, अमिताभ बच्चन यांनी तिच्यासाठी मोठा बार सेट केला होता. म्हणूनच त्यांच्या सारखी व्यक्ती शोधणे तिच्यासाठी खूप कठीण झाले. पुढे नमिता थापर हसली आणि म्हणाली – ‘बच्चन साहेबांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं. त्यांच्यानंतर मला कोणी दुसरा व्यक्ती आवडलाच नाही.’

शार्क टँक इंडियाच्या न्यायाधीश नमिता थापर कोण आहेत?

नमिता थापर ही सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक आहेत. नमिता एम्क्योर फार्मा या वर्ल्ड वाइड फार्मास्युटिकल कंपनीची कार्यकारी संचालक आहेत. 2021 मध्ये, नमिता थापरची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *