तू केवढा मी केवढा… जेव्हा हत्तीवर हल्ला करायला गेलेल्या सिंहाची होते फजिती, पाहा व्हिडीओ


मुंबई : सिंह हा जंगलाचा राजा आहे. एवढेच नाही तर जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी देखील आहे. त्याने जर कोणाची शिकार करायची ठरवलं की, तो प्राणी गेलाच. त्याच्या हातातून तो प्राणी सुटणं अशक्यचं. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहाला शिकार करणं महागात पडलं. हा व्हिडीओ हत्ती आणि सिंहीणीच्या लढाईचा आहे.

यामध्ये हत्तीला सहज शिकार समजून सिंहाच्या कळपाने त्याच्यावर ताव मारला, मात्र यानंतर जे काही दिसते ते पाहण्यासारखे आहे. व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि काही वेळात शेकडो लाईक्स मिळाले आहेत.

हत्ती आणि सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्ती आरामात तलावातील पाणी पीत आहे, तेव्हा तेथे सिंहाचा कळप आला. हत्तीला काही समजण्याआधीच सिंहीणने त्याच्यावर उडी माली आणि हत्तीच्या पाठीवर जाऊन बसली.

तेवढ्यात दुसऱ्या सिंहीणही तिथे पोहोचली आणि तिने हत्तीला पायाला पकडायला सुरुवात केली. परंतु कोणाला काही समजण्याच्या आता हत्ती सिंहाच्या कळपातून निघून गेला. हत्तीने जास्त मेहनत न घेता फक्त आपलं अंग हलवलं. ज्यानंतर या सिंहीणीच्या ताब्यातून हत्ती सुटला. त्याला यांच्या तावडीतून सुटण्यासाठी जास्त मेहनत करावी लागली नाही.

हत्तीने जंगलातील सर्वात धोकादायक शिकारींना काही सेकंदात हुसकावून लावले. हा व्हिडीओ फारच मनोरंजक आहे. ज्याला लोकांनी पुन्हा पुन्हा पाहिलं आहे.

वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर wild_animals_creation नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आले आहे.Source link

Leave a Reply