Headlines

रायगडचे किनारे पर्यटकांनी बहरले; दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनावर भर; मुंबई- पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांची गर्दी

[ad_1]

अलिबाग : दिवाळीच्या सुट्टीत अनेकांनी पर्यटनावर भर दिला आहे. मुंबईच्या जवळच असल्याने पर्यटकांनी रायगड जिल्ह्यतील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दर्शवली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी रायगड जिल्ह्यतील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. रुपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी-पोफळीच्या बाग यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहे.  गेली तीन वर्षे करोनामुळे हे किनारे ओस पडले होते. आता दिवाळीत मात्र पर्यटकांची पावले पुन्हा रायगडकडे वळली आहेत. मुंबई- पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांनी इथे गर्दी केली आहे. दोन-चार दिवस निवांत स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी लोक घराबाहेर पडले आहेत. निमित्त दिवाळीचे असले तरी पर्यटक रायगडच्या किनाऱ्यांवर मोकळा श्वास घेताना दिसत आहेत. वेगवेगळे वॉटरस्पोर्ट्स, उंटसवारी , घोडागाडी यामुळे बच्चे कंपनीच्या आनंदाला पारावर उरलेला नाही .

करोनामुळे रायगडचा पर्यटन व्यवसाय व्हेंटिलेटरवर होता. या व्यवसायातील अनेक जण कर्जबाजारी झाले होते; पण आता पर्यटन व्यवसायावरील हे मळभ दूर झाल्याचे दिसून येत आहे. अलिबागसह नागाव, किहिम, काशीद, दिवेआगर, मुरूड इथल्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आहे. माथेरानचे रस्तेही गजबजले आहेत. त्यामुळे व्यावसायिक खूश आहेत. आगामी काळात ही गर्दी आणि व्यवसायदेखील वाढेल, असा अंदाज आहे.

दोन दिवसांत १० हजार पर्यटक दाखल

   गेल्या दोन दिवसांत अलिबाग, नागाव, किहिम परिसरांत जवळपास १० हजार पर्यटक दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश हॉटेल्स, रिसॉर्टवर बुकिंग पूर्ण झाले आहेत. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन पर्यटकांनी जलप्रवासी वाहतुकीला पसंती दिली आहे. तर तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर नेरळ-माथेरान रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला झळाळी आली आहे.

पावसाळय़ामुळे चार महिने पर्यटकांची संख्या रोडावली होती; पण दिवाळीची सुट्टी सुरू झाल्यापासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पर्यटकांची संख्या येत्या काही दिवसांत आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आम्हाला आनंद होतोय की यापुढेही धंदा चांगला होईल.

– रुपेश चेवले, व्यावसायिक

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *