आज लोकप्रिय असलेला भुबन बड्याकार ‘काचा बादाम’साठी पैसे कधीच घेत नव्हता, कारण…


मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यामातून कधी कोण कसं प्रसिद्धीच्या झोतात येईल सांगता येत नाही. तसंच काहीसं सध्या काचा बादाम फेम भुबन बड्याकार सोबत घडलं आहे. 

गायक भुबन याचा एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला कि तो रातोरात लोकप्रिय बनला. त्याच्या गाण्यावर संपुर्ण जग थिरकायला लागलं. अनेकांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

त्याचा ऑरिजनल व्हिडिओ व्हायरल होताच तो ऑडिओ वापरुन लोकांनी या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले. सोशल मीडियावर महिन्याभरापासून हा ट्रेंड सुरु आहे.

काचा बादाम या त्याच्या शेंगदाणे विकण्याच्या स्टाईलमुळे तो आज सगळीकडे चर्चेत आहे. काचा बादाम विकण्यासाठी म्हणजे शेंगदाणे विकण्यासाठी तो अशाप्रकारे गाणं बोलायचा.. 

पण या गाण्याचा अर्थ देखील समोर आला आहे. तो शेंगदाणे विकण्यासाठी पैसे घेत नव्हता. तो शेंगदाण्यांच्या बदल्यात वस्तू लोकांकडून घेतो. तो बांगड्या, चैन अशा वस्तू द्या आणि त्या जागी तितक्याच वजनाचे शेंगदाणे द्या असं या गाण्यातून सांगत आहे. 

त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला होता की, तो नक्की काय बोलत आहे. त्यानंतर समोर आलं की, तो शेंगदाणे विकण्यासाठी पैसे नाही, तर वस्तू देण्याची मागणी गाण्याच्या माध्यमातून करत आहे. त्याच्या या स्टाईलमुळे रातोरात स्टार झाला आहे. 

Bhuban Badyakar (5) - Mix India

पण आता त्याचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. गाडी चालवत असताना त्याचा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. Source link

Leave a Reply