TMKOC : तारक मेहतामधील ‘पोपटलाल’ हॉलीवूड चित्रपटात, चाहत्यांसाठी शेअर केला Video


TMKOC Popatlal : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 14 वर्षानंतरही या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या मालिकेतली प्रत्येक पात्र चांगलंच लोकप्रिय झालं आहे. या मालिकेतील अनेक कलाकार कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीपासून आहेत. या पैकीच एक कलाकार म्हणजे श्याम पाठक (Shyam Pathak). श्याम पाठक तारक मेहता या मालिकेत पोपटलालचं (Popatlal) पात्र साकारतात. 

पण श्याम पाठक यांची ओळख केवळ पोपटलाल पूरतीच मर्यादित नाही. त्यांच्याबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक यांनी हॉलीवूडमधल्या एका चित्रपटात भूमिका साकारली आहे. 

हॉलीवूड चित्रपटात केलं आहे काम
श्याम पाठक यांना तारक मेहता मालिकेने भरपूर प्रसिद्धी दिली. आज अनेकजण त्यांना पोपटलाल याच नावाने ओळखतात. पण टेलीव्हिजनवर काम करण्यापूर्वी श्याम पाठक यांनी थेट हॉलीवूड चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाची एक क्लिप त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

श्याम पाठक चायनीज चित्रपट ‘लस्ट कॉशन’मध्ये दिसले होते. या चित्रपटात त्यांनी दिग्गज अभिनेते अनूपम केर यांच्यासोबत काम केलंय.. 2007 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याते ते एकद अस्खलित इंग्लिश बोलतानाही दिसत आहेत.

श्याम पाठव यांच्यावर चाहते खूश
तारक मेहतामधले पोपटलाल यांची आंतरराष्ट्रीय चित्रपटातील काम पाहून चाहत्यांनी कौतुक केलं आहे. श्याम पाठक यांचा अभिनय पाहून चाहते प्रभावित झाले आहेत. ‘लस्ट कॉशन’ चित्रपटानंतर श्याम पाठक यांनी ‘तारक मेहता’च्या माध्यमातून घराघरात स्वत:ची वेगळ ओळक निर्माण केली आहे. 

‘सुख बाय चान्स’, ‘जसुबेन जयंतीलाल’, ‘जस्सी जैसी कोई नही’ या कार्यक्रमातही श्याम पाठक यांनी अभिनय केला आहे. पण तारक मेहतामधल्या कामाने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. Source link

Leave a Reply