‘तिची’ Smile जगात भारी; पाहा कोण आहे ही परदेशी बाला, जिचं हिंदू संस्कृतीवर जीवापाड प्रेम


मुंबई : काही चेहरे हे त्यांच्या वेगळेपणामुळं मनात कायमस्वरुपी घर करतात. या चेहऱ्यांना सहजासहजी विसरणं कठीण. मुळात पहिल्या नजरेतच काहीजण आपल्या मनात घर करुन जातात. या व्यक्तींवर आपण प्रेम करू लागतो असं नाही, पण त्यांचं असणं नकळतच आपल्याला आनंद देऊन जातं. चेहऱ्यावर हास्य आणून जातं. 

अशीच एक अभिनेत्री आहे, जिच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहून भलेभले घायाळ झाले. दीपिकालाही मागं टाकणारी ही अभिनेत्री भारतीय नसली, तरीही तिचं भारतावर आणि इथल्या संस्कृतीवर विशेष प्रेम. 

2010 मध्ये ती चित्रपटाच्या निमित्तानं या देशात आली काय आणि तिनं हिंदू धर्म स्वीकारला काय. आपल्या अनोख्या व्यक्तीमत्त्वामुळं असंख्य चाहत्यांना घायाळ करणारी ही अभिनेत्री आहे ज्युलिया रॉबर्ट्स. (julia roberts )

चित्रपटांमध्ये भावाला मिळालेलं यश पाहिल्यानंतर पत्रकारितेचा अभ्यास केलेल्या ज्युलियानं चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. 

‘नॉटिंग हिल’ या तिच्या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. या चित्रपटामध्ये ज्युलियाचं सौंदर्य कमाल खुलून आलं आहे. तिच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहून तुम्हीही , ‘जगात भारी’ असंच म्हणाल. 

1988 मध्ये तिनं Mystic Pizza (1988) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. गेली कित्येत दशकं ज्युलियानं तिच्या अदांनी प्रेक्षकांवर मोहिनीच घातली असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. विश्वास बसत नसेल तर, तिचा एखादा चित्रपट पाहाच. Source link

Leave a Reply