Headlines

बार्शी तालुक्यातील “या” गावाने केला दारू न पिणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार

बार्शी/प्रतिनिधी – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील मौजे पिंपळवाडी गावात आयुष्यात कधीही दारू न पिणाऱ्या वीस ग्रामस्थांचा शाळ – श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर पूर्वी कधीतरी दारू पिणारे परंतु आता पूर्णपणे व्यसनापासून दूर झालेल्या 20 ग्रामस्थांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

आयुष्यात कधीही दारू न पिणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉक्टर संदीप तांबारे व पिंपळवाडीच्या सरपंच सौ. जयश्री रमेश चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी व्यसनमुक्ती केंद्राचे देवा चव्हाण , दीपक शेळवणे , रोहित गोरे , सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी, उपसरपंच गोवर्धन चौधरी ,ग्रामपंचायत सदस्य अजमुद्दिन मुलाणी , पूजा चौधरी , रेश्मा चौधरी , रोहित चौधरी ,सुतार ,श्रीमंत गुरुजी , गोवर्धन माने , दत्ता पाटील , परशुराम पाटील , बाबासाहेब डांगे , शैला चौधरी , जयश्री चौधरी , सोनाली गर्जे , विद्या चौधरी व पिंपळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *