Headlines

माझ्या हातात काहीच नव्हतं…; टी-20 वर्ल्डकपबाबत Yuzvendra Chahal ने व्यक्त केली मनातील खदखद

[ad_1]

Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या खेळामुळे, कधी मस्तीमुळे तर कधी काही इतर कारणामुळे. युझवेंद्र गेले 2 टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) खेळू शकला नाही. 2021 मध्ये त्याला सिलेक्ट केलं गेलं नव्हतं. तर 2022 मध्ये त्याचं सिलेक्शन होऊन प्लेईंग 11 (Playing 11) मध्ये त्याचा खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान याच गोष्टीवरून युझवेंद्रने पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकतंच युझवेंद्र एका कार्यक्रमामध्ये सामील झाला होता. यावेळी त्याला वर्ल्डकपमध्ये समाविष्ट न केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने उत्तर देताना, हे टीम कॉम्बिनेशनचं प्रकरण आहे. मी पूर्णपणे तयार होतो, मात्र सिलेक्शनसारख्या गोष्टी माझ्या हाताता नव्हत्या, असं म्हटलं आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी चहल पूर्णपणे होता तयार

या कार्यक्रमात बोलताना चहल म्हणाला की, टीमचं कॉम्बिनेशन असतं. हा एक टीम गेम असतो. यामध्ये रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल होते. सगळे जण चांगला खेळ करत होते. बाकी माझ्या हातात काही नव्हतं. कोच आणि रोहित शर्मासोबत मी क्लियर होतो. सर्वांनी मला तयार रहायला सांगितलं होतं. मी देखील पूर्णपणे तयार होतो, कारण टीममध्ये खेळण्याची संधी कधीही मिळू शकत होती.

चहलने पुढे म्हटलं की, मी 2 टी-20 वर्ल्डकप खेळू शकलो नाही म्हणून काय झालं, मी 2019 मध्ये वनडे वर्ल्डकप खेळलो होतो. टीम इंडियासाठी खेळणं ही गर्वाची गोष्ट असते. मी इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. आता पुढच्या वर्षी वर्ल्डकप खेळायचा आहे, त्यामुळे माझा संपूर्ण फोकस त्याकडे आहे. 

वर्कलोड मॅनेजमेंटबाबत चहलचं मोठं विधान 

वर्कलोड मॅनेजमेंट आणि ऑप्शनल प्रॅक्टिसबाबत बोलताना युझी म्हणाला, अनेकदा तुमचा प्रवास देखील मोठी भूमिका बजावतो. तुमचं शरीर पूर्णपणे थकून जातं. अनेकदा प्रवासानंतर तुम्ही अधिक थकता. अशावेळी टीम मॅनेजमेंट तुम्हाला प्रॅक्टिसचा ऑप्शन देते. मात्र सर्जरीनंतर तुम्ही जेव्हा कमबॅक करता तेव्हा तुमच्या शरीराल आराम देणं गरजेचं असतं. 

टी-20 वर्ल्डकपमध्ये मिळाली नाही खेळण्याची संधी

यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये युझवेंद्रचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला एकाही सामन्यासाठी प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट केलं नाही. युझवेंद्रने टी-20 वर्ल्डकपसाठी संपूर्ण तयारी केली होती. याशिवाय गेल्या वर्ल्डकपमध्ये त्याचं सिलेक्शन करण्यात आलं नव्हतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *