Headlines

ठाणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार | Ward wise final voter lists for Thane municipal elections will be released today msr 87

[ad_1]

ठाणे महापालिका निवडणूकिसाठी प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या आज (शनिवार) प्रसिद्ध करण्यात येणार असून या याद्या नागरिकांना ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग (मुख्यालय) तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

प्रारूप मतदार याद्यांबाबत आलेल्या १३८ तक्रारी निकाली काढल्या –

ठाणे महापालिकेची निवडणुक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुक विभागाने राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार निवडणुक पुर्वतयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनाने प्रभाग रचना अंतिम करण्यापाठोपाठ प्रारूप मतदार याद्या तयार केल्या होत्या. पालिका निवडणुक विभागाने नुकतीच प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यात एकूण मतदारांची संख्या १३ लाख ९० हजार ६९१ इतकी आहे. त्यामध्ये ७ लाख ४५ हजार ४२४ इतके पुरुष मतदार तर, ६ लाख ४५ हजार १६७ इतक्या स्त्री मतदार आहेत. तसेच इतर मतदारांची संख्या १०० इतकी आहे. या यादीनुसार पालिका क्षेत्रात एक लाख ६२ हजार ८५ हजार मतदार वाढले आहेत. या प्रारूप मतदार याद्यांबाबत आलेल्या १३८ तक्रारी निकाली काढत पालिका निवडणूक विभागाने अंतिम यादी तयार केली आहे.

नागरिकांना मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध –

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज (शनिवार) प्रसिध्द करण्यात येत आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि निवडणूक विभाग (मुख्यालय ) आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन ठेवण्यात येणार आहेत. तसेच मतदार याद्या महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र, तळमजला येथे आगाऊ मागणी नोंदविल्यास कार्यालयीन वेळेत विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती पालिकेने दिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *