Headlines

Team India: T20 वर्ल्ड कपमध्ये या घातक ऑलराउंडरचे पुनरागमन? Asia Cupमधून पडला होता बाहेर

[ad_1]

मुंबई : Ravindra Jadeja: दुखापतीमुळे सुरु असलेल्या आशिया चषक 2022 मधून (Asia Cup 2022) बाहेर पडला होता. हा भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्यावरी मंगळवारी गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 33 वर्षीय जडेजाने आपल्या दुखापतीबद्दल अपडेट माहिती सोशल मीडियावर दिली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.

रवींद्र जडेजा दिली ही माहिती

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने आपल्या फोटोसह इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे की, ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली. बीसीसीआय, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, डॉक्टर आणि चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी लवकरच माझे  पुनरागमन करु शकेन आणि लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतेन. तुमच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.’ या अष्टपैलू खेळाडूने शुक्रवारी स्पर्धेतून बाहेर पडण्यापूर्वी पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्ध सुरू असलेल्या आशिया चषकाचे पहिले दोन सामने खेळले.

आशिया कपच्या मध्यात दुखापत

रवींद्र जडेजा आणि  हार्दिक पांड्या यांच्यात चांगली केमेट्री दिसून येत आहे. त्यांच्यामुळे टीम इंडियात चांगले संतुलन दिसून येत होते. मात्र, त्याची जागा कोणीही घेतलेली नाही. त्याने पाकिस्तानवर भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. जडेजाने पाकिस्तानविरुद्ध दोन षटकांत केवळ 11 धावा दिल्या. भारताच्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकावर पदोन्नती होण्यापूर्वी भारताच्या पहिल्या सातमध्ये तो एकमेव डावखुरा फलंदाज होता. त्याने हार्दिक पांड्यासोबत 52 धावांची भागीदारी करताना 29 चेंडूत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला होता. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जडेजाला मोहम्मद नवाजने बोल्ड केले, त्यानंतर पंड्याने षटकार मारून सामना संपवला.

जाडेजाची उत्तम कामगिरी 

दुसरीकडे, हाँगकाँगविरुद्ध डावखुऱ्या फलंदाजाला फलंदाजीची संधी मिळाली नाही. गोलंदाजीदरम्यान, त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या बाबर हयातला बाद केले आणि त्याच्या चार षटकात केवळ 15 धावा दिल्या. जडेजाला उजव्या गुडघ्याचा त्रास होण्याची ही पहिलीच वेळ नाही, कारण याच दुखापतीमुळे त्याला जुलैमध्ये भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडावे लागले. त्याचबरोबर आशिया चषकासाठी भारतीय संघात जडेजाच्या जागी अक्षर पटेल याला पाचारण करण्यात आले होते, मात्र तो अद्याप एकही सामना खेळलेला नाही.

T20 विश्वचषक परतणार का?

रवींद्र जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत स्पष्टता नाही. मात्र, भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या T-20 विश्वचषकात त्याला पाहायचे आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या सुपर 4 सामन्यापूर्वी द्रविड म्हणाला होता, विश्वचषक अजून दूर आहे, आणि आम्ही कोणत्याही निष्कर्षावर जाऊ इच्छित नाही किंवा त्यावर काहीही बोलू इच्छित नाही. पुढे काय होते ते पाहू.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *