Headlines

टीम इंडियामागे दुखापतीचं विघ्न, 2 खेळाडूंशिवाय T 20 World Cup कसं जिंकणार?

[ad_1]

मुंबई : आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या (T 20 World Cup 2022) आधी टीम इंडियाचे (Indian Cricket Team) 2 स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेत. ऑलराउंडर रवींद्र जाडेजानंतर (Ravindra Jadeja) आता ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) माघार घ्यावी लागली आहे. हे दोघेही बाहेर पडल्याने टीम इंडियाला मजबूत झटका लागला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया या दोघांशिवाय वर्ल्ड कप कसा जिंकणार, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (team india how to win t 20 world cup 2022 without ravindra jadeja and jasprit burah netizens ask question on social media)

जाडेजाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे काही दिवसांपूर्वी माघार घ्यावी लागली होती. आता बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. बुमराहला या दुखापतीतून ठणठणीत होण्यासाठी 4-6 महिन्यांचा वेळ अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. दोघेही स्टार खेळाडू मोठ्या स्पर्धेआधी इंजर्ड झाले. त्यामुळे या दोघांशिवाय सामने जिंकणं भारतासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या निमित्ताने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेटकरी काय म्हणतायेत? 

जाडेजा आणि बुमराहशिवाय टी 20 वर्ल्ड कपची कल्पनाही करवत नाही. टीम इंडियासाठी आता हा वर्ल्ड कप सुरु होताच संपला आहे, असं काही जणांचं मत आहे. तर या दोघांशिवाय कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे, असं ट्विटही नेटकऱ्यांनी केलं आहे. 

 

टीम इंडियाला 2013 च्या चॅम्पियन ट्रॉफीनंतर आयीसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यात आता हे 2 स्टार अनुभवी खेळाडूही नाहीत. त्यामुळे कॅप्टन म्हणून रोहितसमोर मजबूत आव्हान असणार आहे. 

टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार,  हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *