Headlines

“…तर पहिल्या निवडणुकीत किती मतांनी जिंकतो हे दाखवणार” उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला अब्दुल सत्तारांचे जशास तसे उत्तर | abdul sattar challenges uddhav thackeray said will win election with huge margin

[ad_1]

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. रविवारी (२४ जुलै) एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर कठोर शब्दांत टीका केली. हिंमत असेल तर माझ्या वडिलांच्या फोटोशिवाय मतं मागून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांना केले. त्यानंतर आता बंडखोर गटाचे सिल्लोड मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी मला परवानगी दिली तर मी उद्या राजीमाना देणार आणि पहिल्या निवडणुकीत मी किती मतांनी निवडून येणार, हे त्यांना (उद्धव ठाकरे) दाखवून देणार, असं प्रत्युत्तर सत्तार यांनी दिले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> “मला पुष्पगुच्छ नको पण…” निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मागितल्या महत्त्वाच्या ‘दोन गोष्टी’

“मला राजीनामा देण्याची परवानगी द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. परवानगी दिली तर मी उद्या राजीमाना देणार आणि पहिल्या निवडणुकीत किती मतांनी निवडून येणार हे त्यांना (उद्धव ठाकरे) दाखवून देणार,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.

“येत्या ३१ तारखेला मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यात येणार आहेत. सर्व जनता शिंदे यांची वाट पाहत आहे. आमच्या मराठवाड्यात शिंदे यांचा एकही आमदार पडणार नाही, याची शाश्वती मी देतो. मी ४२ वर्षांपासून राजकारणात, २५ वर्षांपासून आमदार, तीन वेळा मंत्री झालो. ते एकदाच मुख्यमंत्री झाले आहेत,” असे म्हणत आम्ही गद्दार नाही असेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर” उद्धव ठाकरेंनी केले शिंदे गटाला लक्ष्य

“आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात कधी आलेच नाही. म्हणूनच माझ्यासारख्या गद्दाराच्या मतदारसंघात या, असं मी त्यांना निमंत्रण देतो. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आहेत. हे सर्व करताना उद्धव ठाकरेंना शिंदे यांच्या निष्ठेवर शंका आहे. आम्ही आता युतीचा धर्म पाळत आहोत. त्यांनी सर्व दरवाजे बंद केले. एकीकडे नेत्याला बदनाम करायचे आणि दुसरीकडे तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत असे म्हणायचे हे राजकारण नसते,” अशा शेलक्या शब्दात सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

हेही वाचा >>> “…तर भाजपाच्या एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता”, युती फॉर्म्यूला आणि मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे रविवारी शिवसैनिकांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना “त्यांना शिंदे गटाला) शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा,” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *