Headlines

T20 World Cup: विराट कोहलीची जागा धोक्यात? 15 सप्टेंबरला होणार फैसला

[ad_1]

T20 World Cup: 27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2022) सुरुवात होणार असून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियातला स्पर्धेतला पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे . एशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या ‘मिशन टी-20 वर्ल्ड कप’ला सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) यंदाची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी जवळपास 90 टक्के टीम ठरली असल्याचं कर्णधार रोहित शर्माचं म्हणणं आहे. तर निवड समितीने अद्याप टीमबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय. एशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवड समितीचं लक्ष असेल. पुढच्या महिन्यात म्हणजे 15 सप्टेंबरला निवड समिती टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडणार आहे.

पण सर्वांचं लक्ष असेल ते टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात विराट कोहलीला (Virat Kohli) संधी मिळणार का याकडे. गेल्या वर्षभरापासून विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजतोय. त्यामुळे विराट कोहलीचं स्थान धोक्यात आल्याचं बोललं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवड समितीनेही प्रत्येक जागेसाठी खेळाडूंमध्ये चुरस असल्याचं म्हटलं, त्यामुळे विराट कोहलीचीही संघातील जागा निश्चित नसल्याचं निवड समितीचं मत आहे.

हर्षल आणि बुमराहच्या फिटनेसवर लक्ष
दरम्यान, भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हर्षल पटेलच्या (Harshal Patel) फिटनेस रिपोर्टवरही निवड समितीचं लक्ष आहे. दोनही गोलंदाज दुखापतग्रस्त असून नॅशनल क्रिकेट अकॅडमीत आहेत. 

संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश?
आयसीसीने (ICC) टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर ठेवली आहे. त्याआधी भारतीय निवड समिती संघ निवडीची प्रक्रिया पूर्ण करेल. प्रशिक्षण राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा या निवड प्रक्रियेचा भाग असतील. 11 सप्टेंबरला एशिया कप स्पर्धा संपत असून त्यानंतर कामगिरीच्या आधारावर संघ निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात तीन वेगवाग गोलंदाजांचा समावेश आहे. पण ऑस्ट्रेलियामधील वेगवान खेळपट्टी पाहता भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *