T20 वर्ल्डकपमध्ये Team India दिसणार नव्या जर्सीत, लाँचिंगपूर्वीच Video व्हायरल


Team India New Jersey For T20 World Cup: पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड केली आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. संघाच्या अधिकृत किट प्रायोजक ‘MPL Sports’ ने याबाबत जाहीर केलं आहे. आगामी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मेन इन ब्लू नवीन जर्सीमध्ये दिसेल. MPL Sports ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितलं आहे की, “चाहते म्हणून तुम्ही आम्हाला क्रिकेटर बनवता.” तर श्रेयस अय्यर म्हणतो की, “जेव्हा तुम्ही आम्हाला उत्तेजित करता तेव्हा खेळ सारखा नसतो.” अय्यरचा 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी निवड समितीने सोमवारीच आपला 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे.

व्हिडीओमध्ये, रोहित आणि हार्दिकने ट्रॅक सूटमध्ये जर्सी घातली आहे जी हलक्या निळ्या रंगाची दिसत आहे. जर्सीचा रंग पूर्वीच्या जर्सीपेक्षा नक्कीच वेगळा असेल, जो डार्क निळा होता. 2020 मध्ये MPL किट प्रायोजक बनल्यानंतर ही तिसरी भारतीय जर्सी असेल. 

T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया- 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहरSource link

Leave a Reply