Headlines

T20 World Cup पुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूने घेतला सन्यास

[ad_1]

मुंबई : येत्या 16 ऑक्टोंबरपासून टी20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपपुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. याआधी रविंद्र जडेजा, हार्दीक पंड्या आणि मोहम्मद शमीने दुखापतीमुळे बाहेर झाले होते. त्यामुळे टीम इंडियाला आधीच धक्का बसला होता. त्यात आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. 

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (Ind vs Sa) मालिकेत व्यस्त असताना आता स्टार खेळाडूने निवृत्ती घेतली आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट टाकत निवृत्ती जाहिर केली आहे. या त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. या स्टार खेळाडूचे नाव अनुरीत सिंग आहे. हा अनुरीत त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच आयपीएलमध्ये देखील तो खुप चर्चेत असायचा. 

पोस्टमध्ये काय म्हणाला?
34 वर्षीय प्रसिद्ध खेळाडू अनुरीत सिंगने (Anureet Singh) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनुरीतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. या पोस्टमध्ये तो म्हणाला की, ‘मला लहानपणापासून क्रिकेटर व्हायचे होते. हा एक अविश्वसनीय क्रिकेट प्रवास होता. मी 16 वर्षांचा असताना दिल्लीतील सुभानिया क्रिकेट क्लबमध्ये सहभागी झालो. 2008 च्या भारतीय देशांतर्गत हंगामात मला भारतीय रेल्वेकडून कर्नाटकविरुद्धच्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली तेव्हा हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते. 

या पोस्टच्या शेवटी, अनुरीत सिंगने (Anureet Singh) बीसीसीआय, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, भारतीय रेल्वे, बडोदा क्रिकेट असोसिएशन, सिक्कीम क्रिकेट असोसिएशन तसेच आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचे आभार मानले.

टीम इंडियातून खेळला का?
अनुरीत सिंगला  (Anureet Singh) टीम इंडियातून (Team India) पदार्पणाची संधी मिळाली नाही, पण त्याने आयपीएल सामन्यात वेगळी छाप सोडली. अनुरीत सिंग आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, केकेआर आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो बडोदा, सिक्कीम आणि रेल्वेकडून खेळला आहे. 

कारकीर्द
अनुरीत सिंगने (Anureet Singh) आपल्या कारकिर्दीत 72 प्रथम श्रेणी, 56 लिस्ट ए आणि 71 टी20 सामने खेळले आहेत. त्याने 249 प्रथम श्रेणी विकेट, 85 लिस्ट ए विकेट आणि 64 टी-20 विकेट घेतल्या आहेत. अनुरीत सिंगने 2008 ते 2018 या कालावधीत आयपीएलमध्ये खेळताना 18 विकेट घेतल्या होत्या.

दरम्यान टीम इंडिया 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या वर्ल्ड कपची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *