T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम


T20 World Cup 2022: पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 2022 सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंडने (New Zealand) मंगळवारी केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली 15 जणांचा संघ जाहीर केला. न्यूझीलंडने गेल्या वर्षी T20  विश्वचषक खेळलेल्या संघात तीन बदल केले आहेत. या संघात एका खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे जो सातव्यांदा T20 विश्वचषकाचा भाग असेल. (new zealand announced squad for t20 world cup 2022 martin guptill kane williamson sc)

हा खेळाडू मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल (Martin Guptill) यंदाच्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणार्‍या T20 विश्वचषकासाठी खेळणार आहे. न्यूझीलंडच्या 15 खेळाडूंच्या संघात मार्टिन गप्टिलचा समावेश आहे. हा विश्वचषक खेळत मार्टिन गप्टिल विक्रमी सातव्यांदा टी २० विश्वचषक खेळणारा खेळाडू ठरेल. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने सहा वेळा विश्वचषक खेळला आहे. तर आता गप्टिल त्याच्या कारकिर्दीत सातव्यांदा विश्वचषक खेळत सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडणार आहे.   

हा खेळाडू 7 व्यांदा T20 विश्वचषक खेळणार

मार्टिन गप्टिलने (Martin Guptill) 2022 च्या T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघात आपली जागा निश्चित केली आहे. पहिल्या T20 विश्वचषकापासून (T20 World Cup 2022) मार्टिन गुप्टिल न्यूझीलंड संघाचा भाग आहे. त्याचवेळी फिन ऍलन आणि मायकेल ब्रेसवेल (Finn Allen and Michael Bracewell) सीनियर टी-20 विश्वचषकात प्रथमच सहभागी होणार आहेत. हे दोन्ही खेळाडू आणि लॉकी फर्ग्युसन यांना काईल जेमिसन, टॉड अॅस्टल आणि टिम सेफर्ट यांच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.

विल्यमसन तिसऱ्यांदा कमांडर

केन विल्यमसन (Kane Williamson) तिसऱ्यांदा ICC T20 विश्वचषकात न्यूझीलंडचे (New Zealand) नेतृत्व करणार आहे. नुकताच केंद्रीय करार नाकारणाऱ्या ट्रेंट बोल्ट (Trent Bolt) आणि जिमी नीशम (Jimmy Neesham) यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याच दरम्यान न्यूझीलंड 22 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध T20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे.

ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न (Melbourne) क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्याच वेळी उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि अॅडलेड ओव्हल येथे होतील.

 वाचा : पाहा Video : पुरुषांच्या बाथरूममध्ये ‘या’ भारतीय खेळाडूंना दिले जेवण

 

T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ:

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

 

 

new zealand announced squad for t20 world cup 2022 martin guptill kane williamson scSource link

Leave a Reply