Sushant Singh Rajput Birthday: शेवटच्या दिवसात सुशांतची अशी होती अवस्था, Video आला समोर


Sushant Singh Rajput last video : दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज 37 वा वाढदिवस आहे. सुशांतच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर त्याचे चाहते पोस्ट शेअर करत त्याची आठवण काढत करत आहेत. सुशांतनं 2020 साली मुंबईतील वांद्रे येथे राहणाऱ्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. आज त्याला जाऊन जवळपास अडीच वर्ष उलटलं तरी देखील तो सगळ्यांच्या आठवणीत जिवंत आहे. दरम्यान, या सगळ्यात सुशांतचा शेवटच्या दिवसातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सुशांतच्या शेवटच्या दिवसातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सुशांतच्या शेवटच्या दिवसातील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओत सुशांत काहीशा चिंतेत असल्याचे दिसत आहे. त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधी गोळी झाडल्याचा दावा अनेकांनी केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सुशांतला समोरून एक स्त्री काही प्रश्न विचारताना दिसते. त्यावर सुशांत विचित्रपणे बडबडताना दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

सुशांतच्या या शेवटच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी सुशांतची आठवण काढली आहे. अनेक चाहत्यांनी रडण्याचे इमोजी शेअर करत त्यांचे दुःख व्यक्त केले. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. सुशांतचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले जात होते. सगळ्यात आधी करण्यात आलेल्या तपासात ही आत्महत्या असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी ही हत्या असल्याचे आरोप केले आहेत. मात्र, सीबीआयनं अद्याप यावर कोणतीही रिपोर्ट दिलेली नाही.  

रिया चक्रवर्तीवर सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. याबाबत तपास यंत्रणांनी रियाची बराच वेळ चौकशीही केली होती. 34 वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांपासून ते अंमलबजावणी संचालनालय (ED), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) पर्यंत सगळ्यांनी तपास केला होता. 

हेही वाचा : Sushant Singh Rajput च्या वाढदिवसानिमित्तानं Unseen फोटो शेअर करत बहीण झाली भावूक, म्हणाली…

दरम्यान, सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा दावा मुंबईतल्या कूपर रुग्णालयातल्या ( Cooper Hospital, Mumbai) शवागृहातील कर्मचारी रुपकुमार शहा ( Roopkumar Shah) यांनी केलाय. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहातच काम (Mortuary Servant) करत होते. अभिनेता सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या शरीरावर जखमा आणि मुका मार होता असा दावा त्यांनी केलाय. याबद्दल डॉक्टरांना सांगूनही त्यांनी लक्ष दिलं नाही असा दावा त्यांनी केलाय.Source link

Leave a Reply