Headlines

सुधीर रसाळ, किशोर कदम सौमित्र, प्रणव सखदेवे, किरण गुरव यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार

[ad_1]

नवी दिल्ली, दि. :30  साहित्य अकादमीने आज 2021 या वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा केली असून यात प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ, कवी किशोर कदम सौमित्र, युवा लेखक प्रणव सखदेव व बालसाहित्यकार किरण गुरव यांच्या साहित्याचा समावेश आहे.

साहित्य अकादमीने 22 भाषातील पुरस्कार प्राप्त साहित्यकांची घोषणा केली. यात मराठीत युवा लेखक प्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीला युवा लेखक पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बालसाहित्यामध्ये किरण गुरव यांच्या बलुच्या अवस्थांतराची डायरी व तसेच त्यांना जुगाड या कादंबरीला सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. सुधीर रसाळ यांच्या मर्ढेकरांची कविता : जीवनाचे अंत:स्वरुप या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय हरीश्चंद्र थोरात यांच्या मूल्यभानाची सामग्री या समीक्षाग्रंथाला, बालाजी सुतार यांच्या दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी या लघुकथेची साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रमेश वानखेडे यांच्या सायबर संस्कृती या निबंधाला तर प्रसिद्ध कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या बाऊल या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जी. के. ऐनापुरे यांच्या चिंचपोकळी यांच्या कथासंग्रहाला तर ज्येष्ठ लेखक व माजी खासदार जनार्दन वाघमारे यांच्या ‘यमुनेचे पाणी’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये रोख व ताम्रपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *