कचरा वाचण बंद करा… ट्रोल्सर्समुळे हैराण झालेल्या आई-बाबांना मलायकाचा मोलाचा सल्ला


मुंबई : मलाइका अरोरा (Malaika Arora) आपल्या स्टाइलमुळे कायमच ट्रोल्सच्या निशाण्यावर असते. सोशल मीडियावर मलायकाच्या अनेक पोस्टवर खूप उलटे-सुलटे कमेंट येत असतात. तिच्यावर होणाऱ्या या टिकेमुळे मलायकाचे पालक खूप हैराण होतात. मलायकाच्या आई-वडिलांना याचा खूप त्रास होतो. 

मलायका अरोरा बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे. जी आपल्या स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. तिची फॅशन कधी तिच्या ट्रोलिंगची कारण देखील बनते. तिच्या खासगी आयुष्यवरही अनेकदा चाहते बोलतात. याचा त्रास तिच्या पालकांना होता. यावेळी मलायका आपल्या पालकांना खूप मोलाचा सल्ला देते. 

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. अनेक व्हिडीओ आणि फोटो तिच्या ट्रोलिंग आणि टिकांना सामोरे जात असते. याचा राग मलायकाने एका मुलाखतीतून व्यक्त केला आहे. 

मलायका म्हणते की, मी तर याबाबत विचार करण खूप आधीचं सोडलं आहे. मात्र माझे आई-वडिल कायम बोलत असतात. तुझ्याबद्दल असं बोललं गेलं… तसं बोललं गेलं… कुणी काय कमेंट केली. तेव्हा मलायकाने त्यांना सर्वात आधी हा कचरा वाचणं बंद करा… असं सांगितलं. 

फालतू गोष्टींमध्ये आपली एनर्जी नका घालवू, असं देखील मलायका बोलली. मलायका म्हणाली की, ते माझे पालक आहेत. काही उलटं सुलटं ऐकलं तर ते नाराज होतात. ती पुढे म्हणाले की, पण जेव्हा मी त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते कळलं. 

मलायका अनेकदा आपल्या खासगी आयुष्यामुळेही ट्रोल झाली आहे. मलायकाने अरबाजसोबतचं नातं संपवून घटस्फोट घेतला. आपल्यापेक्षा कमी वयाच्या अर्जुनसोबत मलायकाचं नातं आहे.Source link

Leave a Reply