स्टार महिला खेळाडूच मोठं विधान, म्हणाली, ‘लिंग, जात…’


मुंबई : नेशनल टेलिव्हिजनवर अनेक प्रसिद्ध व्यक्ती मग ती सेलिब्रिटी असो, किंवा एखादा खेळाडू, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे नेहमीच टाळत असतात. मात्र या स्टार महिला खेळाडूने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुपचं मोठं विधान केलं आहे. या तिच्या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.  

स्टार महिला खेळाडूने एका ऱिअॅलिटी शोमध्ये म्हटले आहे की, तिच्या आयुष्यात हिरो नाही तर हिरोईन आहे. तिच्या या विधानानंतर अनेकांच्या भूवय्या उंचावल्या होत्या. मात्र समोर बसलेल्या जजनेही यावर आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर एकच टाळयांचा गजर झाला.  

‘ही’ आहे खेळाडू
प्रसिद्ध व्यावसायिक धावपट्टू आणि राष्ट्रीय चॅम्पियन दुती चंद (dutee chand) हीने वरील विधान केले आहे. दुती चंदने ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhla Jaa 10) या रिअॅलिटी शोमध्ये पार्टीसिपेट केले आहे. नुकताच तिने तिचा एक परफॉर्मन्स तिच्या पार्टनरला डेडिकेट केला होता.  या संदर्भातला प्रोमोही समोर आला आहे.  

काय म्हणाली प्रोमोमध्ये?
 दुती चंदच्या (dutee chand)  एका स्पेशल परफॉर्मन्सचा प्रोमो मेकर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्टेजवरील परफॉर्मन्सनंतर शोचा होस्ट मनीष पॉल दुती चंदला (dutee chand)  विचारतो की, तुझ्या आयुष्याचा हिरो कोण आहे? यावर हसत दुती चंद म्हणते की, ‘माझ्या आयुष्यात हिरो नाही तर हिरोईन आहे’. ‘प्रेम एक अशी गोष्ट आहे, ज्यात लिंग, जात, रंग काहीही दिसत नाही’. या तिच्या विधानानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे. 

दुती चंदच्या (dutee chand)  या प्रतिक्रियेवर जज करण जोहर (Karan Johar) म्हणाला की, किती मुली आणि मुले असतील, जी भीतीमुळे मोकळेपणाने आयुष्य जगू शकत नाहीत. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की, अशीच एक कथा दुती चंदची आहे. आणि त्यांनी सर्वांनी ही पहावी आणि प्रेरणा घ्यावी. मी तुम्हाला खरोखर सलाम करतो. करण जोहरच्या या विधानानंतर तिथे उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवू लागले. 

खास परफॉर्मन्स
खरं तर, या वीकेंडला दुती चंद (dutee chand) तिच्या परफॉर्मन्समधून तिची लव्हस्टोरी सांगताना दिसणार आहे. हा तिचा परफॉर्मन्स तिच्या मैत्रिणीला समर्पित करताना दिसणार आहे. या परफॉर्मन्सची शोच्या चाहत्यांना उत्सुकला लागली आहे.  

दरम्यान झलक दिखला जा (Jhalak Dikhla Jaa 10)  शोमध्ये रुबिना दिलीक, निया शर्मा, शिल्पा शिंदे, अमृता खानविलकर, फैजल शेख, गश्मीर महाजन आणि नीति टेलरसह सारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. यामध्ये दुती चंदचेही (dutee chand)  नाव येते. मैदानावरचा तिचा परफॉर्मन्स सर्वांनी पाहिलाच आहे, मात्र आता डान्सच्या मैदानावर ती कशी बाजी मारते हे पहावे लागणार आहे. Source link

Leave a Reply