सौंदर्याची नवी परिभाषा मांडणारी जॅकलिनची ‘ड्युप्लिकेट’ घालतेय धुमाकूळ


मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिनं फार कमी वेळात लोकप्रियता मिळवली. श्रीलंकन ब्युटी, म्हणून नावारुपास आलेल्या या अभिनेत्रीनं तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केलं. सोशल मीडियावरही जॅकलिनच्या फॉलोअर्सची संख्या काही कमी नाही.   (Jacqueline Fernandez) 

एखादी वेस्टर्न आऊटफिट असो किंवा मग भारतीय पेहराव, प्रत्येक वेळी जॅकलिन समोर आली तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी तिनं पाहणाऱ्यांच्या नजरा स्वत:वर खिळवल्या. 

आता पुन्हा एकदा काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. जिथं ही सौंदर्यवती Topless दिसत आहे. ही जॅकलिन आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. 

कारण ही आहे तिची ड्युप्लिकेट. जॅकलिनशी मिळताजुळता चेहरा असणाऱ्या अमांडा केरनी (Amanda Cerny) हिनं एका मासिकासाठी नुकतंच फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये तिनं शरीरावर फक्त एक टॉवेल गुंडाळला होता. 

अमांडाच्या मागे एक मोठं पेंटिंगही पाहायला मिळालं. या पेंटिंगमध्येही एक महिला रेखाटल्याचं पाहायला मिळाली होती. अमांडानं वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंग सुरु केली होती. सुरुवातीला ती आवड म्हणून या क्षेत्रात होती. पण, त्यानंतर मात्र ती अभिनेत्री म्हणून नावारुपास आली. 

अमांडा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. एकंदर लोकप्रियता पाहता या अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकला कमाल पसंती मिळताना दिसते. जॅकलिनशी तिचा चेहरा कितपत जुळतो ठाऊक नाही. पण, अमांडाचं सौंदर्य मात्र भुरळ पाडणारं आहे, असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply