सोनमच्या प्रेग्नेंसीवर अर्जुन कपूरची उडवली खिल्ली, शरमेनं खजील अभिनेता


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनम कपूर (Sonam Kapoor) आपल्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सोनमने काही दिवसांपूर्वी पती आनंद अहूजा (Anand Ahuja) सोबत आपल्या गरोदरपणाची बातमी शेअर केली. याकरता सोनमने हॉट फोटो पोस्ट केला आहे. 

बुधवारी सोनम कपूर पती आनंद अहुजाच्या स्टोर लाँचच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी सोनमचा चुलत भाऊ अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या दरम्यान पापाराझीने असं काही म्हटलं की, अर्जुन शरमेने मान खाली घालून गेला. 

फोटोग्राफर्सने उडवली अर्जुनची खिल्ली 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की अर्जुन कपूर  कुणाला तरी भेटत आहे. जेव्हा एक फोटोग्राफर त्याला ‘मामा बन गए आप’ म्हणतो. हे ऐकून अर्जुन कपूर हसायला लागतो आणि तिथून निघून जातो.

‘मामा’ हा शब्द ऐकल्यावर अर्जुनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

ज्यावर लोक खूप कमेंट करत आहेत आणि अर्जुन कपूरला ‘मामा’ बनल्याबद्दल अभिनंदन करत आहेत आणि त्याच्या गोंडस स्माईलच कौतुक देखील करत आहेत.

सोनम कपूरने शेअर केली गोड बातमी 

सोनम कपूरने सोमवारी इन्स्टाग्रामवर पती आनंदसोबतचे काही फोटो शेअर करून तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती.

फोटोंमध्ये सोनम कपूर पती आनंद (Anand Ahuja)  च्या मांडीवर पडलेली दिसली. यावेळी लिहिलेली कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. Source link

Leave a Reply