Headlines

सोलापूरमध्ये चतुर्थीच्या दिवशीच पुरातत्त्व खात्याकडून गणपती मंदिरातील फरशीची तोडफोड, भाविकांचा आरोप | Devotee allege damage of Ganpati statue by Archaeology department in Siddheshwar Temple Solapur

[ad_1]

सोलापुरातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिरात गणपती मूर्तीच्या बाजूला एका भाविकाने स्वखर्चाने लावलेल्या स्टाईल फरशीची पुरातत्व खात्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच तोडफोड केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. तसेच संबंधित पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, अन्यथा शिवसेना स्टाईलने पुरातत्व विभागाचं कार्यालय फोडून उत्तर दिलं जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

सिद्धेश्वर मंदिरातील गणपती मूर्तीशेजारी ओबडधोबड असल्याने एका भाविकाने सुंदर स्टाईल फरशी केली होती. मात्र, याबाबत पुजारी व भाविकाला फरशी काढून टाकण्याची नोटीस दिली. तसेच गणेश चतुर्थीदिवशी त्या मंदिरातील मूर्तीच्या आजूबाजूला लावलेली फरशी पुरातत्व खात्याकडून काढण्यात आले. आमच्या परवानगीशिवाय कोणी काही करायचे नाही, अशी भूमिका पुरातत्व विभागाने घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

“पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे हे मंदिर विकासापासून कोसो दूर”

माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असं असताना पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे हे मंदिर विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. मंदिर परिसरातील भिंतीची डागडुजी करणे गरजेचे आहे, अशी तक्रार ब्रह्मपुरी, माचणूरसह पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थांनी केली आहे.

“अधिकाऱ्यांनी पहार, हातोडा आणि गजाने मूर्ती फोडली”

भाविक शरद कोळी म्हणाले, “मंगळवेडा तालुक्यातील भीमा नदीच्या काठी माचणूर येथे शंकराचं मंदीर आहे. त्या मंदिरात गणपतीरायांची मूर्ती आहे. ती मूर्ती पुरातत्व खात्यातील काही अधिकाऱ्यांनी पहार, हातोडा आणि गजाने फोडून काढली. तसेच मूर्तीच्या आजूबाजूला भक्तांनी फरशी बसवलेली फरशी काढली.”

“बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा”

“यामुळे येथे येणाऱ्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या भाविकांचं मन दुखावलं आहे. याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ तुरुंगात घाला,” अशी मागणी शरद काळे यांनी केली. तसेच अन्यथा शिवसेना स्टाईलने महाराष्ट्रभर आंदोलन करावं लागेल, असा इशाराही देण्यात आला.

हेही वाचा : आईच्या वर्षश्राद्धातील ५०० रुपयांची उधारी देण्यावरून वाद, सोलापुरात मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

“अन्यथा पुरातत्व खात्याचं कार्यालय अशाचप्रकारे फोडलं जाईल”

शरद कोळी पुढे म्हणाले, “या अधिकाऱ्याची पार्श्वभूमी पाहिली तर यामागे दंगल घडवण्यााचं षडयंत्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की १२ तासाच्या आत संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा पुरातत्व खात्याचं कार्यालय अशाचप्रकारे फोडलं जाईल. याला पुरातत्व खातं, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी राहतील.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *