Headlines

सोलापूरच्या तरुणांची जाहिरात आणि मीडिया या मेनस्ट्रीम मार्केट मध्ये यशस्वी वाटचाल

मेनस्ट्रीम मार्केट मध्ये कोणतेही प्रिव्हिलेज नसताना जाणे हे किती आवघड असतं हे आपल्याला ठाऊक आहेच.आर्थिक परिस्थिती नसताना व्यवसायिक पार्श्वभूमी नसताना असं धाडसी पाऊल उचलून ते यशश्वीरित्या पूर्ण करून दाखवल आहे.


शैक्षणिक आयुष्य ते व्यवसायिक वाटचाली पर्यंत मैत्री जपणाऱ्या मनोज देवकुळे, राजेश गट्टू, कृष्णा माळवेकर व शिवकुमार देडे यांची सुरुवात मोबाईल वरून शॉर्ट फिल्म बनवण्या पासून झाली हळूहळू लागणारे साहित्य त्याच बरोबर आवश्यक प्रशिक्षण घेत त्याच्या आवडीला व्यावसायिक स्वरूप मिळालं सोलापूर तसेच महाराष्ट्रतील इतर जिल्ह्यात आता ते कार्यरत आहेत सोलापूर सारख्या ठिकाणी मेट्रो सिटी प्रमाणे मीडिया सोल्युशन्स देता यावीत या साठी त्यांनी मूळ टीम लहान ठेवून इतर काही फ्रीलान्सर सोबतीने घेऊन काम करण्याचे ठरविले यामुळे योग्य किमतीत पाहिजे तशी सेवा ते देऊ शकत आहेत . मुळ हेतू पैसे कमविणे हा नसून रोजगार निर्मिती तसेच युवा व्यावसायिक बनून सोलापूरची ब्रॅण्डिंग करण्याचे त्याचे ध्येय कौतुकास्पद आहे .

झपाटयाने बदलणाऱ्या टेकनॉलॉजिला योग्य वेळी आत्मसाद करून घेणं हि माणसाची प्राथमिक गरज बनली असून सोलापूर हे विकसनशील शहर यात मागे राहू नये हि मनोमन इच्छा असते शहराच्या डेव्हलपमेंट मध्ये रोजगार निर्माण करणारा व्यवसाय हा महत्वपूर्ण घटक असतो डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सोलापुरातील या व्यावसायिकांना जागतिक स्थरावर घेऊन जाता येऊ शकते हे या क्षेत्राचा अभ्यास करताना समजलं आणि हेच एक कारण या क्षेत्राविषयी रस निर्माण करण्यासाठी पुरेसं ठरलं गेल्या तीन वर्षांपासून आम्ही कार्यरत आहोत विविध ब्रँड ,हॉटेल, शॉप संस्था व प्रसिद्ध व्यक्ती करिता आम्ही काम करत असून सुरुवातीचा बराच वेळ जनजागृती साठी खर्ची घालावा लागला आणि नवीन गोष्टी करिता तो घालावाच लागतो आमच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने इथून पुढे ठोस उपक्रम राबवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. – शिवकुमार देडे , संचालक, व्हीजीबल फिचर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *