Headlines

“तो प्रसंगच भयानक होता” बंडखोरीदरम्यान मनात काय सुरू होतं? गुलाबराव पाटलांनी केला खुलासा | shivsena shinde group minister Gulabrao patil on rebel MLA and ganpati wishes jalgaon rmm 97

[ad_1]

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमचारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला खिंडार पडलं आहे. कुणालाही काहीही अंदाज नसताना एवढ्या मोठ्या गटाने बंडखोरी केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का बसला होता. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलदेखील बंडखोरी करणाऱ्या गटात होते. ही बंडखोरी करताना मनात काय सुरू होतं? याचा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला आहे. तो प्रसंगच खूप भयानक होता, त्यावेळी सर्व देवांची आठवण आली, असं त्यांनी म्हटलं आहे.

आज गुलाबराव पाटलांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. गणरायाकडे काय प्रार्थना केली असं विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, गणपती बाप्पा आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला सर्वकाही मिळालं आहे. देवाच्या आशीर्वादानेच राजकारणात यश मिळालं आहे. येत्या काळात देव आमच्या पाठीशी राहावेत, अशी प्रार्थना आम्ही केली आहे.

हेही वाचा- पंजाब : सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चर्चची तोडफोड; कारला लावली आग, परिसरात तणाव

बंडखोरी करत असताना मनात गणपती बाप्पाची आठवण येत होती का? असा प्रश्न विचारला असता बंडखोरीदरम्यान मनात काय सुरू होतं? याचा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला आहे. ते म्हणाले की, “शिंदे गटात सामील होताना प्रत्येक क्षणाला देवाची आठवण येत होती. कारण तो प्रसंगच भयानक होता. त्या प्रसंगात प्रत्येक देवाची आठवण आली. हिंदू धर्मात बरेच देव आहेत, वेळोवेळी त्या-त्या देवाची आम्ही प्रार्थना केली.”

हेही वाचा- “मुस्लीम तरुणानं हिंदू मुलीला पळवून नेऊन जबरदस्तीने विवाह केला”, ‘त्या’ घटनेबाबत भाजपा खासदाराचा गंभीर आरोप!

पुढे त्यांनी म्हटलं की, “बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्यासाठीच हे सर्व घडलं आहे. बाळासाहेबांचे विचार संपू नयेत, ते कायम तेवत राहावेत, यासाठीच शिवसेनेत हा उठाव झाला. मला तरी वाटतं की, बाळासाहेबांची शिवसेना होती, बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना कायम राहिल. शिवसेनेचं आता जे गतवैभव आहे, त्यापेक्षा दुप्पटीने शिवसेनेचं गतवैभव वाढू दे… हीच बाप्पाकडे प्रार्थना आहे.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *