[ad_1]
वाचा: अशी संधी पुन्हा नाही! २ हजारांच्या बजेटमध्ये मिळतील जबरदस्त ५जी स्मार्टफोन्स, फीचर्स एकदा पाहाच
Aadhaar Card वरील जन्मतारखेत असा करा बदल
- ऑनलाइन जन्म तारखेत बदल करण्यासाठी https://ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमचा १२ आकडी आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड व्हेरिफाय करा.
- पुढे सेंड ओटीपी ऑप्शनवर क्लिक करा. हा कोड तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
- तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवलेल्या ओटीपीला व्हेरिफाय करून लॉग इन करा.
- आता Date of birth चा पर्याय निवडा.
- त्यानंतर पुरावा म्हणून मूळ कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा.
- तुम्हाला जर जन्मतारीख बदलण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, हे माहित नसल्यास https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf या लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
- कागदपत्रं अपलोड केल्यानंतर सबमिट करा.
- या प्रक्रियेनंतर आधारवरील जन्मतारखेत बदल होईल. यानंतर तुम्ही अपडेटेड आधार कार्डची ऑनलाइन प्रिंट देखील काढू शकता.
दरम्यान, लक्षात ठेवा की आधार कार्डवरील माहितीत बदल करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी या नंबरवर येईल. जन्मतारखेसोबतच तुम्ही आधारवरील इतर चुकीची माहिती देखील ऑनलाइन मिनिटात बदलू शकता. यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही.
वाचा: ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे तब्बल २,४०० रुपये कॅशबॅक, करावे लागेल ‘हे’ काम; पाहा डिटेल्स
वाचा: फक्त एका मिस कॉलने इतरांना पाठवता येतील पैसे, इंटरनेटचीही गरज नाही; जाणून घ्या प्रोसेस
वाचा: मस्तच ! होळीच्या आधी ‘या’ कंपनीने केली स्मार्टवॉचेसच्या किमतीत कपात, लगेच ऑफर्स पाहा
[ad_2]