Headlines

Smartphone Tips: काहीही डिलीट न करता फोनचे फुल झालेले स्टोरेज करा रिकामे, वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

[ad_1]

नवी दिल्ली: how to free up space on your phone: स्मार्टफोन आल्यापासून जगात अनेक मोठे बदल झाले आहे. स्मार्टफोन व इंटरनेट सहज उपलब्ध असल्याने अगदी मिनिटात कोणतेही काम करणे शक्य आहे. स्मार्टफोनमध्ये आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेवत असतो. खासगी फोटो, व्हिडिओपासून ते महत्त्वाच्या फाइल्स फोनमध्ये सेव्ह असतात. तसेच, प्रत्येक कामासाठी आपल्या फोनमध्ये एक अ‍ॅप उपलब्ध असते. इंटरनेटवरून देखील आपण अनेक फोटो-व्हिडिओ डाउनलोड करत असतो. मात्र, यामुळे फोनचे स्टोरेज फुल होते व डिव्हाइस हँग होऊ लागतो. तुमच्या फोनचे स्टोरेज फुल झाले असेल, मात्र तुम्हाला महत्त्वाच्या फाइल्स डिलीट करायच्या नसल्यास आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहेत. या सोप्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही काहीही डिलीट न करता सहज फोनचे स्टोरेज रिकामे करू शकता. या ट्रिकविषयी जाणून घेऊया.

वाचा : Flipkart Sale: मस्तच! LG Washing Machine वर बंपर डिस्काउंट, सुरूवाती किंमत फक्त ११,१९० रुपये

स्मार्टफोनचे स्टोरेज फुल झाल्यास डिव्हाइस हँग होतो व स्लो काम करू लागतो. अशा स्थितीमध्ये फोनचे स्टोरेज रिकामे करण्यासाठी तुम्ही गुगल ड्राइव्हमध्ये तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स, फोटो-व्हिडिओ अपलोड करू शकता. गुगल ड्राइव्हमध्ये कोणत्याही फाइलला अपलोड करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. तुम्हाला केवळ गुगल ड्राइव्ह अ‍ॅपला ओपन करून प्लस आयकॉनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या सर्व महत्त्वाच्या फाइल्सला गुगल ड्राइव्हमध्ये अपलोड करायचे आहे. अशाप्रकारे तुम्ही काहीही डिलीट न करता सहज स्मार्टफोनच्या इंटर्नल स्टोरेज रिकामे करू शकता. स्टोरेज कमी झाल्यास फोन देखील हँग होणार नाही.

वाचा – १५ हजारांच्या बजेटमधील बेस्ट ५जी स्मार्टफोन्स, फीचर्स जबरदस्त

तुम्ही फोनमधील अ‍ॅप्सचा बॅकग्राउंड डेटा क्लिअर करून देखील स्मार्टफोनचे स्टोरेज कमी करू शकता. तुम्ही ज्या अ‍ॅप्सचा जास्त वापर करत नसाल, त्यांचा बॅकग्राउंड डेटा क्लिअर करा. सेटिंग्समध्ये जाऊन अशा अ‍ॅप्सची कॅशे मेमरी क्लिअर करा. यामुळे फोनचे स्टोरेज देखील रिकामे होईल व हँडसेट अगदी व्यवस्थित काम करेल.

वाचा – Smartphone Offers: खूपच स्वस्तात मिळतोय १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा मोटोचा भन्नाट फोन, पाहा ऑफर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *