Headlines

स्मार्टफोन वारंवार गरम होत असेल तर वापरा ‘या’ ४ टिप्स, फोन राहणार सेफ आणि कूल

[ad_1]

नवी दिल्ली: सध्या सगळीकडे तापमान वाढले असून लोक उष्णतेमुळे हैराण आहेत. अशात स्वतःची काळजी घेण्यासोबतच Electronic Devices ची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुमचा स्मार्टफोन लवकर गरम होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्मार्टफोन गरम होणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. स्मार्टफोनवर जास्त वेळ गेमिंग केल्यास स्मार्टफोन गरम होतो. पण, दीर्घकाळ उष्णतेमुळे काही काळानंतर स्मार्टफोनवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, Smartphone Heating सामान्य म्हणून दुर्लक्ष करू नये. जाणून घेऊया स्मार्टफोन गरम होण्यापासून कसा वाचवायचा?

वाचा: अर्ध्या किमतीत खरेदी करा ‘हे’ ब्रँड न्यू AC, एसीमध्ये बेस्ट कुलिंग फीचर्स, पाहा कुठे मिळतेय ही ऑफर

फोनसाठी कूलिंग फॅन खरेदी करा

जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर कूलिंग फॅन घ्या. जे फोनला जास्त गरम होण्यापासून रोखण्यास मदत करते. बाजारात फोनसाठी अनेक प्रकारचे कुलिंग फॅन्स आहेत. जे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये येतात. यासोबतच स्मार्टफोन कंपन्या गेमिंग स्मार्टफोनसोबत कुलिंग फॅन्सही देतात. बहुतेक स्मार्टफोन कूलिंग फॅनसाठी क्लॅम्पिंग यंत्रणा वापरतात. परंतु, जर तुम्ही मॅगसेफ चार्जिंगसह आयफोन वापरत असाल, तर कूलिंग फॅन शोधणे फार कठीण जाणार नाही.

फोन कारमध्ये ठेवल्यास लक्ष द्या:

उन्हाळ्यात, कार ग्रीनहाऊस म्हणून काम करू शकते. ज्यामुळे आतील तापमान बाहेरच्या तुलनेत जास्त गरम होते. अशा परिस्थितीत कारमध्ये फोन अजिबात ठेवू नये.

फोन जास्त वेळ उन्हात ठेवणं टाळा:

फोनला जास्त वेळ थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. थेट सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी तुमचा फोन चार्ज करण्यासाठी ठेवल्यास यामुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. चार्जिंगची उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे फोनचा आतील भाग खराब होऊ शकतो.

गरज नसताना Power intensive अॅप्स बंद करा:

फोनमधील काही अॅप्लिकेशन्स खूप Power intense असू शकतात. ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी संपू शकते. तसेच, ते जास्त गरम होऊ शकते. कोणते अॅप्स यास कारणीभूत आहेत हे शोधण्यासाठी, कोणते अॅप्स सर्वाधिक बॅटरी कमी करत आहेत हे पाहण्यासाठी तुमच्या फोनच्या बॅटरी वापर टूलवर जा. हे अॅप्स ओळखल्यानंतर, ते बंद करा आणि त्यांना Background मध्ये चालण्यापासून प्रतिबंधित करा. हे तुमच्या फोनवरील वर्कलोड कमी करतील आणि त्यामुळे ते जास्त गरम देखील होणार नाही.

वाचा: सुपरफास्ट स्पीडने चार्ज होणार OnePlus 10, स्मार्टफोनमध्ये मिळणार १५० W फास्ट चार्जिंग सपोर्ट, पाहा डिटेल्स

वाचा: घरात पडून असलेल्या जुन्या मोबाइल्समध्ये आहे खरं सोनं, फेकण्यापूर्वी करा विचार, पाहा डिटेल्स

वाचा: आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या १४१ रुपयांमध्ये १ वर्षाची व्हॅलिडिटी, रोज १ GB डेटासह ‘हे’ फायदे, पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *