Headlines

Shukra Gochar 2022: 9 दिवसांनंतर ‘या’ राशींचे भाग्य बदलणार, शुक्राच्या गोचरामुळे परदेशात जाण्याचा योग

[ad_1]

Shukra Rashi Parivartan 2022: ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह आपली रास बदलत असतो. या गोचरामुळे ठराविक राशींमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे विशिष्ट योग तयार होतात. तसेच ग्रहांच्या राशी बदलामुळे प्रत्येक राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. या महिन्यात पाच मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. यात शुक्र ग्रहाचाही समावेश आहे.  13 जुलै रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह या राशीत 7 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यानंतर शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो. शुक्र ग्रह संपत्ती आणि चैनीचा कारक आहे. चला जाणून घेऊया शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल.

मिथुन – ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राच्या संक्रमणामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तीला जीवनात यश मिळेल. फायद्याच्या अनेक संधी मिळतील. परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे संक्रमण विशेषतः फलदायी ठरेल. तुम्ही कामानिमित्त बाहेर जाणार असाल तर त्याचा फायदाही होऊ शकतो. भागीदारीत काम करत असाल तर फायदा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, सकारात्मक परिणाम दिसून येतील.

तूळ – या राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभही मिळणार आहे. या दरम्यान, आर्थिक लाभाची जोरदार शक्यता दिसत आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होण्याची शक्यता आहे. मेहनत करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल. व्यवसायात तुम्ही एखादा मोठा करार फायनल करू शकता. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक मोठ्या संधी मिळतील.

धनु – नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कार्यालयात कामाचं कौतुक होईल. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

कुंभ – ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. पैशांची आवक वाढेल. या काळात बॉस आणि वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. त्यांचे सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांना मोठे यश मिळू शकते. प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देईल आणि तुम्हाला यश मिळेल.

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *