Headlines

श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही – कॉ. राजन क्षिरसागर

“कष्टकरी वर्गाला नेस्तनाभूत करण्याचे षडयंत्र भांडवली धर्मांध शक्ती आखात आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे सर्वांगाने मुश्किल झाले आहे . या विरोधात राजकीय संघर्षाला कम्युनिस्ट पक्ष पुढील काळामध्ये उभा राहील. श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही.” – कॉ. राजन क्षिरसागर

बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा कौन्सिलचे अधिवेशन 17 जुलै 2022 रोजी आयटक कामगार केंद्र बार्शी येथे संपन्न झाले यावेळी लाल बावटा ध्वज राज्य निरीक्षक राज्य कार्य. सदस्य कॉम्रेड राजन क्षिरसागर व कॉ. सुवर्णा कांबळे यांच्या हस्ते फडकवून सुरू झाले. यावेळी मंचावर शहीद भगतसिंग , सुखदेव, राजगुरू, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी राज्य निरीक्षक कॉ. राजन क्षिरसागर म्हणाले “कष्टकरी वर्गाला नेस्तनाभूत करण्याचे षडयंत्र भांडवली धर्मांध शक्ती आखात आहेत, सर्वसामान्य जनतेचे जगणे सर्वांगाने मुश्किल झाले आहे, या विरोधात राजकीय संघर्षाला कम्युनिस्ट पक्ष पुढील काळामध्ये उभा राहील, श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादा शिवाय पर्याय नाही.”

राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणाचा बाजार याने लोक त्रस्त आहेत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकत्यांनी जनतेमध्ये जाऊन त्यांना कडव्या संघर्षाला उभे करावे.”

यावेळी जिल्हा सचिवांचा अहवाल मांडला त्यावर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली. यावेळी पुढील कार्यक्रम ठरवून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ; यामध्ये जिल्हा सचिव म्हणून कॉम्रेड डॉ.प्रवीण मस्तुद, सहसचिव कॉ.नवनाथ कांबळे, कॉ. सतीश गायकवाड, त्यासोबतच कार्यकारणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे भाकप राज्य कार्य. सदस्य, कॉ. ए बी कुलकर्णी, कॉ. शौकत शेख, कॉ. अनिरुध नखाते, कॉ. हूअण्णा पुजारी, कॉ. नरसय्या कंदुल, कॉ.अंबादास तडकापल्ली, कॉ.अमर मुजावर, कॉ. भारत भोसले, कॉ.शहापर शेख, कॉ. दत्तात्रय कोकरे, कॉ. रशीद इनामदार, कौन्सिल सदस्य कॉ.लहू आगलावे, कॉ.धनाजी पवार, कॉ. मधुकर मुडूर, कॉ. श्रीनिवास उड्डपल्ली , कॉ. बाळू शिंदे, कॉ.पांडुरंग यादव, कॉ.संतोष जामदार, कॉ.बाजीराव धुमाळ, कॉ. सुनील जामदार, कॉ. मुबारक मुलानी, कॉ. बालाजी शितोळे, कॉ. लक्ष्मी नेवसे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मंचावर अध्यक्ष मंडळ म्हणून कॉम्रेड शौकत शेख, मुबारक मुलानी, दत्तात्रय कोकरे तसेच जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *