Shocking! अनेक महिलांशी शारीरिक संबंध; 15 वर्षांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या सेलिब्रिटीला 30 वर्षांचा कारावास


मुंबई : जागतिक कलाजगताला हादरा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. एका सेलिब्रिटीकडून घडलेल्या गुन्ह्यामुळं त्याला तब्बल 30 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या 55 वर्षीय अभिनेत्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध जाल्यामुळं तो कायद्याच्या कचाट्याच सापडला आहे. 

हा सेलिब्रिटी आहे, अमेरिकन गायक  आर केली ( R Kelly). सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला त्याच्यावर असणारे 9 आरोप सिद्ध झाले आहेत. मागील 20 वर्षांपासून या प्रकरणातील खटला सुरु होता, ज्याच्या निकालाची सुनावणी करण्यात आली आहे. (Hollywood Singer r kelly sentenced to jail for abusing 15 year old girl)

तरुणी आणि महिलांवर अत्याचार करण्याच्या आरोपांमुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे केलीवर आरोप करणाऱ्या महिला त्याच्या चाहत्यांपैकीच होत्या. 

20 वर्षे चाललेल्या या या खटल्यामध्ये आतापर्यंत तब्ल 45 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. अजूनही या सेलिब्रिटीविरोधातील प्रकरणांची सुनावणी न्यायप्रविष्ठ असून त्यामध्येही तो दोषी आढळल्यास त्याची शिक्षा वाढू शकते. 

केलीविरोधातील सर्वात धक्का देणारी माहिती सर्वांसमोर आली, ती म्हणजे त्यानं एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न केलं होतं. सर्वांपासून त्यानं हे लग्न केलं होतं. या मुलीचं लैंगिक शोषण करण्याचेही त्याच्यावर आरोप आहेत. 

असंही म्हटलं जातं, की या मुलीशी लग्न करण्यासाठी त्यानं आपल्या मॅनेजरच्या मदतीनं काही अधिकाऱ्यांकडून तिचे बनावट ओळखपत्र तयार करुन घेतले होते. यासाठी त्यानं घसघशीत लाचही दिली होती. 

सेलिब्रिटींकडून लैंगिक शोषण होण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही काही हॉलिवूड कलाकारांची नावं अशा प्रकरणांमध्ये धक्कादायकरित्या समोर आली आहेत. ‘मीटू’ मोहिमेअंतर्गतही झगमगाटाच्या मागे असणारं काळं सत्य संपूर्ण जगासमोर आलं होतं. जॉनी डेप, हार्वे वेनस्टेन, केविन स्पेसी अशी नावं त्यातून समोर आली होती. Source link

Leave a Reply