Shocking News : ‘200 बिहारी आणून…’ ; प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी


मुंबई : सध्या कलाजगतामध्ये एका अभिनेत्रीनं डिलीट केलेल्या ट्विटची बरीच चर्चा सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या ट्विटमध्ये तिनं आपल्याला आचाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं लिहिलं होतं. आपल्याकडे यासंदर्भातील व्हिडीओ असल्याचंही तिनं ट्विटमध्ये सांगितलं होतं. (television Actress Mahhi Vij receives Death Threat By Cook)

आता एका मुलाखतीत तिनं या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. सध्या प्रचंड भीतीमध्ये जगणारी ही अभिनेत्री आहे, माही विज. तिनं सांगितल्यानुसार हा आचारी गेल्या काही काळापासून त्यांच्याकडे काम करत होता. पण, तो आपल्याकडे चोरी करत असल्याची बाब तिच्या लक्षात आली. 

जय, अर्थात माहिचा पती अभिनेता जय भानुशाली यानं जेव्हा त्या आचाऱ्याच्या महिन्याच्या पगाराचा हिशोब करत गोष्ट संपवण्याचा विषय केला तेव्हाही तो बाचाबाची करु लागला, तेव्हाच त्यानं जीवे मारण्याची धमकीही दिली. माहीच्या मनात हीच भीती बसली. आपल्या जीवापेक्षा लेकिच्या जीवाची चिंता असल्याचं ती म्हणाली. 

मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ 
माहीच्या लेकिची काळजी घेणाऱ्या महिलेनं तिला त्या इसमाबद्दलची पूर्वकल्पना दिली होती. ‘तिन दिवसांपूर्वी आम्हाला त्याच्या चोरीची कल्पना देण्यात आली होती. मी जयला सांगण्याची वाटच पाहात होते. जय आल्यावर आचारी त्याचे सर्व पैसेमाहू लागला. जेव्हा जयनं त्याला कारण सांगितलं तेव्हा 200 बिहारी उभे करेन.. अशा शब्दांत आम्हाला धमकी दिली’, असं माहीनं सांगितलं. त्यानं मद्यधुंद अवस्थेत आपल्याला शिवीगाळ केल्याचंही ती म्हणाली. 

सध्या हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं आहे. या व्यक्तीनं तिला आणि जयला फोन करुनही धमक्या दिल्या आहेत. तिच्याकडे याविषयीच्या रेकॉर्डिंगही आहेत. हल्ली आजुबाजूला प्रत्येक गोष्टीमुळं धडकी भरत असल्याचं सांगत तिनं मनातील भीती व्यक्त केली. 

मला त्यानं चाकू भोसकून मारलं तर काय होईल? लोकं आंदोलनं करतील, याचा फायदा काय? मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती आहे. तो जामिनावर बाहेर येईल, मला आता माझ्या मुलीचीच चिंता वाटत आहे. माहीच्या मनातील ही भीती पाहता आता या प्रकरणी पुढील कारवाई काय असेल यावरच सर्वांचं लक्ष आहे. Source link

Leave a Reply