धक्कादायक : ‘या’ व्यक्तीकडे आहेत 50 प्रसिद्ध अभिनेत्रींच्या ‘सेक्स टेप’


मुंबई : सध्या केविन ब्‍लाटचं नाव खूप चर्चेत आहे. त्याच्याकडे अनेक बड्या अभिनेत्रींच्या सेक्स टेप्स असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, बहुतेक प्रकरणांमध्ये त्याने टेप रिलीज करण्याऐवजी त्या बरबाद केल्या आहेत. तो स्वत:ला जगाचा ‘स्कँडल स्पेशालिस्ट’ म्हणून ओळख बनवत आहे. नुकताच एक रिपोर्ट समोर आला होता. ज्यामध्ये त्याच्या या व्यवसायाबाबत मोठा खुलासा करण्यात आला होता.

एडल्ट इंडस्ट्रीत काम करणाऱ्या हॉलिवूड लोकांनी केविनला ‘सेलिब्रिटी सेक्स टेप ब्रोकर’ असं नाव दिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आधी ऑनलाइन एडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचा. त्यादरम्यान त्याने 50 हून अधिक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रींच्या टेप्स पाहिल्या आहेत. ज्यामध्ये किम कार्दशियनच्याही नावाचाही समावेश आहे.

किमकडून 156 कोटी? 
अमेरिकन गायक रे जेसोबतच्या सेक्स टेपसाठी त्याने १५६ कोटी रुपये कमावल्याचा केविनचा दावा आहे. ही घटना 2006 ची आहे. मात्र, किम आणि रे या दोघांनीही अशा घटनेचा पुर्णपणे विरोध केला आहे.

केविननुसार, त्याने अनेक अभिनेत्रींच्या सेक्स टेप्समधून कोट्यवधींची कमाई केली आहे. मात्र 70 टक्के प्रकरणांमध्ये त्याने टेप बरबाद केल्या आहेत. तसंच दोन-तीन अभिनेत्रींशिवाय कोणाचंही नाव जगाला सांगितलं नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याने सांगितलं की, तो 1996 मध्ये कॅलिफोर्निया, यूएसए येथे गेला होता. त्याने नोकरी केली पण 2003 पासून तो सेक्स टेप्सच्या व्यवसायात उतरला.

पॅरिस हिल्टनची टेप रिलीझ 
केविनच्या मते, 2003 च्या सुमारास त्याच्या एका मित्राने अमेरिकन अभिनेत्री पॅरिस हिल्टनचा सेक्स व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये ती तिचा बॉयफ्रेंड रिक सोलोमनसोबत दिसली होती. यादरम्यान त्याने ते 37 लाखांना विकत घेतले, मात्र अनेकांनी त्याच्यावर 1.5 अब्जची केस केली. त्यानंतर 2003 मध्ये हा सेक्स व्हिडिओ रिलीज झाला. असं म्हटलं जातं की, सुरुवातीला पॅरिस व्हिडिओ विकण्यास तयार होती नव्हती, मात्र नंतर तिच्या परवानगीशिवाय तो रिलीज करण्यात आला. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता.

कॅमेरून डियाजचे न्यूड फोटोज
केविनने अभिनेत्री कॅमेरून डियाजची गोष्टही शेअर केली आहे. तो दावा करतो की, एक काळ असा होता जेव्हा त्याला कॅमेरून डियाझचे फोटो मिळाले. एका फोटोग्राफरने ते त्याच्याकडे आणले होते. त्या बदल्यात त्याला अडीच लाख डॉलर्स मिळावेत, अशी फोटोग्राफरची इच्छा होती. त्यानंतर अभिनेत्रीने केविनची मदत घेतली आणि तिने आयपी अॅड्रेसच्या मदतीने फोटोग्राफरचा शोध घेतला. जॉन रुटर असं या फोटोग्राफरचं नाव आहे.Source link

Leave a Reply